शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा

By संजय तिपाले | Updated: August 27, 2025 17:12 IST

गणेशोत्सवाच्या प्रारंभीच मोठी कारवाई : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक

गडचिरोली : लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच तिकडे भामरागडमध्ये छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात माओवाद्यांना सुरक्षा यंत्रणेला नुकसान पोहोचविण्यासाठी तळ ठोकला. मात्र, याची भनक लागताच जिल्हा पोलिसांच्या सी- ६० पथके व राज्य राखीव पोलिस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी  २५ ऑगस्ट रोजी पहाटे संयुक्त मोहीम राबवून माओवाद्यांचे कटकारस्थान हाणून पाडत मोठे 'विघ्न' परतावून लावले. आठ तासांच्या धुमश्चक्रीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून घटनास्थळाहून शस्त्रास्त्रेही हस्तगत केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गडचिरोली- नारायणपूर सीमेवरील  कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाच्या गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी २६ ऑगस्ट रोजी अपर अधीक्षक  एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० ची १९ पथके आणि राज्य राखीव दलाच्या शीघ्रकृती दलाची दोन पथके  रवाना केली होती. मात्र, या भागात पाऊस हाेता, त्यामुळे अभियान राबविताना अडचण येत हाेता. २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभियान राबविताना माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आठ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसरात शोध घेतला असता ४ जहाल माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यात एक पुरुष व तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून घटनास्थळाहून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल व अन्य एक .३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे.     जिल्हा वर्धापनदिनी होता घातपाताचा कटदरम्यान, २६ ऑगस्ट रोजी कोपर्शी जंगल परिसरात माओवादी तळ ठोकून बसले होते. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होऊन २६ ऑगस्ट राेजी ४३ वर्षे पूर्ण झाले. जिल्हा वर्धापनदिनाच्या दिवशी घातपाती कारवाईचा माओवाद्यांचा कट असण्याची शक्यता आहे. मात्र, हा डाव जवानांनी उधळून लावला. 

कोपर्शी जंगलात वर्षभरातील दुसरी मोठी कारवाईयापूर्वी कोपर्शी जंगलात २१ ऑक्टोबर २०२४ रोजी माओवादी व जवानांत चकमक झाली होती.  या चकमकीत दोन पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. दहा महिन्यांत याच जंगलात दुसऱ्यांदा अभियान राबवून जवानांनी चार माओवाद्यांचा खात्मा केला. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली