शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण व पंचनाम्यासाठी यंत्रणा शेतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:25 IST

परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा अहवाल तयार होणार : देसाईगंज तालुक्यातील शेतकºयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शासकीय यंत्रणा शेतात पोहोचली असून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.तालुक्यात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासधूस केली तर उभ्या असलेल्या धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले असुन शेतकºयांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही धानपीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे. शेतकरी कुटुंबाने धिर सोडू नये, असे आवाहन आ.कृष्णा गजबे यांनी केले.जुनी वडसा येथील प्रभाकर मुळे यांच्या धानपीकाची पाहणी केली. तालुक्यात जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा परिसरात धान पिकावर तुडतुडा या रोगाने थैमान मांडले आहे. असंख्य शेतकºयांच्या शेतातील संपूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. यामुळे आ. गजबे यांच्या आदेशाने जिल्हा, तालुक्यातस्तरीय कृषी विभाग, महसूल विभागातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.शेतातील धानपीकाची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भेटी देऊन पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठवा, अशा सूचना कृषी अधिकारी, व महसूल विभाग यांना केल्या असून शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मदत मिळवून देण्याची ग्वाही गजबे यांनी दिली.देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा येथे भेटी देऊन धानपीकाची पाहणी केली. याप्रसंगी जि.प.सदस्य रोशनी पारधी, सचिन खरकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तालुका कृषी अधिकारी धेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, बोथीकर, ग्रा.पं. सदस्य मंगला शेंन्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त धानपिकाचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागामार्फत सुरू झाल्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्याची शक्यता आहे.