दर्शनासाठी भाविकांची गर्दी : अरविंद पोरेड्डीवार यांची उपस्थिती वैरागड : महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थानात येऊन हजारो भाविकांनी हर हर महादेवचा गजर करीत विधीवत पूजा-अर्चा करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. तीन दिवस चाललेल्या या यात्रेत अनेक धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शनिवारी सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या उपस्थितीत टिपूर जाळून या यात्रेचा समारोप करण्यात आला. श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी यात्रा भरविली जाते. हजारो भाविक दाखल होता. त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्वच स्तरातील लोकांचे सहकार्य लाभते. भाविकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास तातडीचा उपचार करण्यासाठी वैद्यकीय सेवाही पुरविली जाते. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने चोख पोलीस बंदोबस्तात यात्रेचे आयोजन करण्यात येते. अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते टिपूर जाळून या यात्रेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष डोनू कांबळे, उपाध्यक्ष विश्वनाथ ढेंगरे, सचिव बालाजी पोफळी, सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, भास्कर बोडणे, ग्रा.पं. सदस्य माधुरी बोडणे, नलिनी सहारे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त प्रलय सहारे, महादेव दुमाने, लिलाधर उपरे, सुरेश लांजीकार, निंबाजी टेकाम, शिवराम बोदेले, धर्माजी उपरीकार, उमराव तागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अरविंद पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
टिपूर जाळून भंडारेश्वर यात्रेचा समारोप
By admin | Updated: February 27, 2017 01:17 IST