शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

२४० बचत गटांची महोत्सवात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआत्मा व डीआरडीएच्यावतीने आयोजन : विविध कलाकुसरीच्या वस्तू बघून भारावले मान्यवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या महोत्सवात २४० बचत गटांनी सहभाग घेतला. काही बचत गटांनी स्वत:चा उद्योग स्थापन करून भरारी घेतली आहे. त्यांच्या या उद्योग व्यवस्थापनाचे कौशल्य प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून आले.जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, नगराध्यक्ष योगीता पिपरे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, कृषी विभागाच्या उपसंचालक अर्चना कडू, जिल्हा परिषद सदस्य मिना कोडाप, निता साखरे, नामदेव सोनटक्के, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास तांबे, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यात वनौषधी मोठ्या प्रमाणात आहे. या वनौषधीची मागणी राज्य व राष्ट्रीयस्तरावर केली जाते. वनौषधीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास वाव आहे. बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करता येतात. शहरातील बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना चांगली मागणी आहे. एकदम मोठे उद्योग उभारण्यापेक्षा लहान उद्योगातून प्रगती करीत मोठ्या उद्योगाकडे वाटचाल करा, असे आवाहन केले.जिल्हाधिकाºयांनी मार्गदर्शन करताना शेतीच्या माध्यमातूनही आर्थिक प्रगती साधता येते. मात्र शेतीकडे त्यादृष्टीने बघणे आवश्यक आहे. बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू महोत्सवात ठेवण्यात आल्या असून त्या बघण्यासाठी शेतकºयांनी कृषी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन केले.आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील शेतीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले फार कमी शेतकरी जिल्ह्यात आहेत. शेतीला शेतीपुरक उद्योगधंद्याची जोड देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले. प्रदर्शनाला शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.अखेर आमदारांनीच केले महोत्सवाचे उद्घाटनजिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निमंत्रित करण्यात आले होते. पत्रिकेत उद्घाटन सोहळ्याची वेळ १२ वाजता दिलेली होती. मात्र दीड वाजूनही पालकमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचले नाही. आलेले शेतकरी कार्यक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे दीड वाजता दीप प्रज्वलीत करून उद्घाटन न करताच मार्गदर्शनपर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. अडीच वाजेपर्यंत पालकमंत्री पोहोचतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तोपर्यंत मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच मार्गदर्शन केले. सुमारे ३.३० वाजेपर्यंत कार्यक्रम लांबविण्यात आला. मात्र पालकमंत्री अहेरी येथील ट्रॅक्टर वितरण कार्यक्रमात अडकून पडले होते. उद्घाटनानंतर जेवन ठेवण्यात आले होते. मात्र ३ वाजूनही कार्यक्रम संपत नव्हता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या ९० टक्के महिलांनी काढता पाय घेतला. ३.३० वाजूनही पालकमंत्री न पोहोचल्याने आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.च्जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेकडे जेवनाची व्यवस्था सोपविण्यात आली होती. या विभागाने केवळ १ हजार ५०० शेतकºयांच्या जेवनाची व्यवस्था केली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची संख्या अधिक झाल्याने अर्धेअधिक शेतकरी व महिला बचत गटाचे पदाधिकारी उपाशीच राहिले. याबाबत महोत्सवासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.कृषी महोत्सवात ठेवण्यात आलेल्या होस्टन फ्रिजन (एचएफ) व जर्सी गाय तसेच मुºहा जातीची म्हैस व इतर जनावरे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. होस्टन फ्रिजन ही गाय पारडी येथील सदाराम मुरतेली यांच्या मालकीची होती. सदर गाय दर दिवशी किमान २२ लिटर दूध देते. कोटगल येथील भगवान ठाकरे यांची जर्सी जातीची गाय प्रदर्शनात होती. सदर गाय दरदिवशी किमान २० लिटर दूध देते. तर कोटगल येथील गणेश सुरमवार यांची मुऱ्हा जातीची म्हैस ही शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. सदर म्हैस दिवसाला १५ लिटर दूध देते. त्याचबरोबर बेरारी ब्रिडचे बकरे, विविध प्रकारच्या कोंबड्या, देवणी, थारपारकर, गीर, काँक्रेज, साईवाल, रेडसिंधी आदी प्रकारच्या गायी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.