शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:05 IST

तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देदारूसाठा, मोहसडवा व साहित्य जप्त : कागदपत्रे रोखून ग्रामपंचायत करणार विक्र ेत्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.आरमोरी तालुक्यापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू गाळली जाते. त्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही विक्र ेते जुमानत नाही. त्यामुळे हे गाव इतरही गावांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मुक्तिपथ अभियानाच्या तालुका टीमने येथे बैठक घेऊन आधी महिलांना संघटीत केले.महिला स्वबळावर दारूविक्र ी बंद करू शकत असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे गेल्या आठवड्यात येथे गाव संघटन तयार करून महिलांनीच दारूच्या प्रश्नावर विशेष ग्रामसभा बोलविली. या ग्रामसभेत गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. सोबतच २८ दारू विक्र ेत्यांची यादी तयार करून त्यांना विक्र ी बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही गावात दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे दि.१२ रोजी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे गाव संघटनेला कारवाई करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर महिलांनी गावातील महिला व सूज्ञ लोकांना एकत्रित करून दारू विक्र ेत्यांच्या घरी धाड टाकली.एवढेच नाही तर विक्रेत्यांचे जंगलातील अड्डे शोधून काढत दारू, मोहसडवा आणि ड्रम जप्त केले. गावातील काही पुरु षही या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी जप्त केलेली दारू रस्त्यावर ओतून नष्ट केली. मिळालेले साहित्य डोक्यावर उचलून महिलांनी ते चौकात आणले. या अहिंसक कारवाईत कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, माजी सरपंच बालाजी गेडाम, पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी, गावसंघनेच्या अध्यक्ष सुनीता मडावी, सचिव सुलोचना राऊत यांच्यासह ४० ते ४५ महिला आणि पुरु ष सहभागी झाले होते.दाखले व रेशनपासून ठेवणार वंचितदारूविक्र ी बंद होण्यासाठी ग्रामपंचायतने कठोर पाऊल उचलत दारूविक्र ी करीत असलेल्यांना यापुढे रेशनकार्डवर धान्य न देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यासोबतच आवश्यक दाखले आणि कागदपत्रांपासून त्यांना मुकावे लागणार आहे.ग्रामसभेत दारूविक्र ेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. नोटीस देऊनही दारूविक्र ी सुरूच ठेवल्याने विक्र ेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले आहे. त्यांची यादी रोजगार सेवकांना देऊन मस्टरवरून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.