शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

तापाने विवाहित महिला दगावली

By admin | Updated: October 1, 2015 01:39 IST

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला सुरू होऊन सलग तीन दिवस आलेला पाऊस व नंतरच्या कडकडीत उन्हामुळे वातावरणात झालेला फेरबदल यामुळे सिरोंचा तालुक्यात तापाची साथ पसरली आहे.

सिरोंचा तालुका : मुलगी अहेरीला दाखलसिरोंचा : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंधेला सुरू होऊन सलग तीन दिवस आलेला पाऊस व नंतरच्या कडकडीत उन्हामुळे वातावरणात झालेला फेरबदल यामुळे सिरोंचा तालुक्यात तापाची साथ पसरली आहे. परिणामत: पल्लवी स्वामी बोंगोनी (१८), उषाराणी भूमय्या कोत्तावडला (१५), शिवाणी शंकर गंगाधरी (१४), दिव्या रमेश इंदलवार (१५) या विद्यार्थिनींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दुपारी २ वाजतापासून टप्प्याटप्प्याने दाखल झालेल्या या मुलींवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. त्यांना श्वासोच्छवासास अडथळा होत असल्याने रात्री १ वाजता अहेरीस्थित उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. सदर घटनेमुळे शिक्षक व पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावरील आरडा येथील शारदा शंकर अरिगेला (२१) या विवाहित महिलेचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या शरीरात केवळ ४ ग्रॅम हिमोग्लोबिनची मात्रा होती, असे डॉ. मनिष चव्हाण यांनी सांगितले. या सर्व रुग्णांवर डॉ. चव्हाण व प्रशिक्षणार्थी डॉ. शानू चौहान यांनी संयुक्तरित्या उपचार केले. असे असतानाच स्थानिक कस्तुरबा गांधी निवासी कन्या शाळेच्या शिक्षिका खापरे यांनी एका विद्यार्थिनीस ग्रामीण रुग्णालयात आणले. सदर मुलीचे नाव लक्ष्मी नागेश कोनमुला (१३) असून ती रामेशगुडमची रहिवासी आहे. पूर्व खबरदारी म्हणून इतर १०-१२ विद्यार्थिनींचीही तपासणी करण्यात आली. विविध वयोगटातील या स्त्री रुग्णांच्या अत्यवस्थता व एका विवाहित महिलेच्या अकाली मृत्युमुळे तालुक्यातील जनमानस धास्तीने ढवळून निघाले आहे. दरम्यान सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार यांनी रात्री ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)