शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची मत्स्य व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 01:29 IST

तालुक्यातील मारोडा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून

 प्रेरणादायी : नाबार्डच्या मदतीने सुरू केला व्यवसाय लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : तालुक्यातील मारोडा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून महिलांनी आर्थिक समृद्धी साधली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायास अनुकूल वातावरण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात माशांची मागणी वाढते. त्यामुळे किंमत वाढते. नाबार्डच्या मदतीने मारोडा येथील महिलांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. या महिलांना नालंदा महिला शिक्षण संस्थेचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक कृष्णा कोल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नियोजन व विकास अधिकारी आर. वाय. सोरते, शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नालंदा देशपांडे, मुरलीधर मेश्राम, तन्मय देशपांडे यांनी प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन महिलांच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मत्स्य व्यवसायाविषयीची माहिती घेतली. आर. वाय. सोरते यांनी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सहकारी संस्थांच्या तुलनेत महिला बचतगटांसाठी अधिक योजना कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. करूणा महिला बचत गटाच्या अध्यक्ष मनीषा बारसागडे यांनी बचतगटाची आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी सदस्या उपस्थित होत्या.