उच्च शिक्षणासाठी निवड : धानोरावरून थेट सातासमुद्रापार शिक्षणाची संधी गडचिरोली : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कोची (केरळ) येथील असिस्टन्टट मॅनेजर रियाज हसनअली गिलानी यांची अमेरीकेतील मिचीगन स्टेट युनिव्हर्सिटी येथे मॉस्टर आॅफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन करिता निवड झाल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते रियाज गिलानी यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी यांचे रियाज हे सुपूत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण धानोरा येथील मराठी प्राथमिक शाळेतून झाले. त्यानंतर दहावीची परीक्षा जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथून उत्तीर्ण केली. त्यावेळी ते गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकावर होते. शासकीय इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथून मेकॅनिकल अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारत पेट्रोलिअम कार्पोरेशनमध्ये अधिकारी म्हणून काम केले. पाच वर्षात दोनदा त्यांना या कंपनीत पदोन्नती असिस्टन्टट मॅनेजवर पदावर मिळाली. ५ आॅगस्टला ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहेत. या सत्कार कार्यक्रमाला डॉ. नामदेव उसेंडी, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, काशिनाथ भडके, देवेंद्र भांडेकर, शंकरराव सालोटकर, नरेंद्र भरडकर, सी. बी. आवळे, पांडुरंग घोटेकर, रजनीकांत मोटघरे, सुभाष धाईत, नंदू वाईलकर, समशेर पठाण, नितेश राठोड, लहूकुमार रामटेके, पी. टी. मसराम, टिपले, डोंगरे, मनोहर पोरेटी, अॅड. गजानन दुगा, जमीर कुरेशी, शांता परसे, प्रतीभा जुमनाके, अमिता मडावी, अर्पणा खेवले, मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश विधाते तर आभार एजाज शेख यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
रियाज गिलानींचा काँग्रेसतर्फे सत्कार
By admin | Updated: July 31, 2016 02:09 IST