शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळ सदस्यांचा सत्कार

By admin | Updated: September 18, 2015 01:15 IST

आरमोरी व गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने बसविले आहे.

अरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करूआरमोरी : आरमोरी व गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने बसविले आहे. या प्रशासकीय मंडळातील सदस्यांचा सत्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आरमोरीच्या सभागृहात बुधवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक खेमनाथ डोंगरवार, जागोबा खेळकर, पोपटराव तितीरमारे, डॉ. दुर्वेश भोयर, बंडुजी ऐलावार, डॉ. बळवंत लाकडे, विदर्भ अर्बन कोआॅपरेटिव्ह असोसिएशनचे संचालक प्रशांत पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. यावेळी गडचिरोली येथील बाजार समितीचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, उपमुख्य प्रशासक रामदास पिपरे, आरमोरीचे मुख्य प्रशासक खिळसागर नाकाडे, उपमुख्य प्रशासक ईश्वर पासेवार, कोरची खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष आसाराम सांडील, कुरखेडाचे व्यंकटी नागीलवार, वडसाचे टिकले, आरमोरीचे मनोज मने व इतर संस्थाच्या नवनिर्वाचीत संचालकांचा अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारीवार, अनंत साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार यांनी सहकार क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सत्ता येते जाते, मात्र सामान्य कार्यकर्त्यांशी कौंटुबीक संबंध टिकून राहणे आवश्यक आहे. त्याकरिताच हा सामान्य कार्यकर्त्यांचा सत्कार आज होत आहे, असे प्रतिपादन केले. सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करू, असेही यावेळी म्हणाले. संचालन ए. आर. निंबेकर, प्रास्ताविक तांबोळे तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार यांनी मानले. कार्यक्रमाला टी. डब्ल्यू. भुरसे, शाखा व्यवस्थापक पुणेकर, विधी अधिकारी अविनाश मूर्वतकर, किरण सांबरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)