गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या कुटुंबियांचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये शहीद वीर पत्नी छाया धनंजय धोटे, शहीद वीर माता स्मिता सुनिल रंगारी, तसेच शहीद वीर प्रकाश बासनवार यांच्या पत्नी यांचा समावेश आहे. तसेच वीर शहीद स्वरूप अमृतकर यांच्या मातेचा नामदार अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहीद कुटुंबियांच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत. केंद्र व राज्य शासनाकडून शहीद कुटुंबियांना संपूर्ण सुरक्षितता व आवश्यक ते सहकार्य सदैव राहिल, अशी ग्वाही नामदार हंसराज अहीर यांनी यावेळी दिली.
शहीद कुटुंबीयांचा गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
By admin | Updated: August 26, 2016 01:09 IST