शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

धारणे कुटुंबावर काळाचा आघात

By admin | Updated: December 14, 2015 01:31 IST

आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे रविवारी रात्री १२.३० वाजता अपघातात सहायक पोलीस निरीक्षक मनोज जनार्धन धारणे यांच्या कुटुंबातील पाच सदस्य ठार झाल्याची वार्ता ...

गडचिरोलीसह बोरमाळाही गहीवरले...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे रविवारी रात्री १२.३० वाजता अपघातात सहायक पोलीस निरीक्षक मनोज जनार्धन धारणे यांच्या कुटुंबातील पाच सदस्य ठार झाल्याची वार्ता पहाटे गडचिरोलीकरांना माहीत होताच संपूर्ण शहर गहीवरून गेले. रविवारी सायंकाळी तीन तिरडीवरून पाच जणांचे शव अंत्यसंस्कारासाठी नेत असताना शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.नागपूरवरून गडचिरोलीकडे येत असताना सहायक पोलीस निरिक्षक मनोज जनार्धन धारणे यांच्या टाटा इंडिका कारला देऊळगाव जवळील तुळशीराम शिवराम हरडे यांच्या घरासमोर टेम्पोने धडक दिली. या धडकेत धारणे यांच्या मातोश्री विमल जनार्धन धारणे, भाऊसून वनिता प्रवीण धारणे, अडीच वर्षीय हर्षीता प्रवीण धारणे या मायलेकींसह चार महिन्यांची रिध्दी प्रशांत धारणे या ठार झाल्या. या सर्वांचे शव आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात रात्रीच आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस उपनिरिक्षक नरवटे, सहायक फौजदार दिलीप मुनघाटे, सहायक फौजदार पुण्यप्रेडीवार, पोलीस हवालदार मच्छीरके, कुमरे यांच्या मदतीने नेण्यात आले. त्याचबरोबर यातील जखमी सुषमा मनोज धारणे व इशिका मनोज धारणे यांना तत्काळ उपचारासाठी नागपूरला पाठविले. अपघातग्रस्त वाहन आरमोरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेची वार्ता पहाटे गडचिरोली शहरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम कळली. त्यानंतर शेकडो नागरिक वाहन घेऊन आरमोरी पोलीस ठाण्यात पोहोचले. तर अनेकांनी धारणे यांच्या कॅम्पएरिया भागातील घराजवळही गर्दी केली. एकाच कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. उल्लेखनिय बाब म्हणजे, रिध्दी प्रशांत धारणे या चार महिन्यांच्या चिमुकलीची आई नागपूर येथे भरती असल्याने ती आपल्या आजीकडे गडचिरोलीलाच होती. शनिवारी तिला आईच्या भेटीसाठी नेण्यात आले. गडचिरोलीकडे परतताना तिच्यावरही काळाने घाला घातला. मृतकांमधील वनिता प्रविण धारणे ही गरोदर होती. रविवारी सकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे व गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी या दोघांनी उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे जाऊन धारणे कुटुंबीयांची चौकशी केली व त्यांचे सांत्वन केले. आरमोरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही मृतकाच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवसभर धारणे यांच्या निवासस्थानी शेकडो नागरिकांची मृतकाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती. आरमोरी उपजिल्हा रूग्णालयातून शवविच्छेदन पार पडल्यानंतर पाचही जणांचे मृतदेह दुपारी ३ वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या व कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. अनेकजण अंतिम दर्शन घेण्यासाठी लगबग करीत होते. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तीन तिरडींवर पाच मृतदेह ठेवून अंतिम यात्रा त्यांच्या निवासस्थानातून काढण्यात आली. चामोर्शी मार्गावर डाक कार्यालयापर्यंत तिरडीवर मृतदेहाचा प्रवास झाल्यानंतर स्वर्गरथातून मृतदेह वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर नेण्यात आले. धारणे कुटुंबीय हे मूळचे सावली तालुक्यातील बोरमाळा गावचे रहिवासी आहेत. बोरमाळातही या घटनेची माहिती सकाळीच पोहोचली. तेथूनही शेकडो लोक अंतिम दर्शन घेण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. त्यानंतर बोरमाळा नदी घाटावर सायंकाळी साडेपाच वाजता एकाच चितेवर सर्वांना अग्नी देण्यात आला. यावेळी पुन्हा एकदा उपस्थित जनसमुदाय गहीवरला. या अपघातात जखमी असलेल्या सुषमा मनोज धारणे व ईशिका मनोज धारणे या मायलेकींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती लोकमतशी बोलताना कुटुंबीयांनी दिली. (नगर प्रतिनिधी)