शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मातृभाषेतूनच भावना व्यक्त होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. पी. निकम यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या विविध ग्रंथ व नाटकांविषयी माहिती दिली.

ठळक मुद्देजिल्हा माहिती अधिकारी अडसूळ : शिवाजी हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मनातील भावना व्यक्त करणे व व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी मातृभाषाच कामी येते. मातृभाषेतून भावना व विचार योग्य प्रकारे मांडले जाऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले.येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राघवेंद मुनघाटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राचार्य ज्ञानेश्वर मामीडवार, उपमुख्याध्यापिका उषा गोहणे उपस्थित होत्या.याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. पी. निकम यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या विविध ग्रंथ व नाटकांविषयी माहिती दिली. ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाचन उपयोगी पडत असल्याने वाचन हा गुण मुलांनी स्वीकारणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.शिक्षणाधिकारी प्राथमिक राघवेंद्र मुनघाटे यांनी शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची केल्याने आता मराठी भाषेला ज्ञान भाषा होण्यासाठी चालना मिळेल. इंग्रजीने मराठी भाषेला वेढले आहे. आपण मराठीत इंग्लिशचा वापर करून दोन्ही भाषांना न्याय देत नाही, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात वकृत्त्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मामीडवार तर आभार प्रा. एस. एल. ताजने यांनी मानले.चर्चासत्रात मांडल्या कल्पनामराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा या विषयावर पत्रकारांसाठी चर्चासत्राचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालयातर्फे करण्यात आले. याप्रसंगी मराठी भाषेचा सर्वच स्तरातून वापर करणे गरजेचे आहे. त्यातूनच मराठीला योग्य दर्जा मिळण्यास मदत होईल, असे मत पत्रकारांनी व्यक्त केले. या चर्चासत्रात पत्रकार अनिल धामोडे, हेमंत डोर्लीकर, रेखा वंजारी यांनी भाग घेतला. १० मिनीटे मराठी भाषेतून उत्कृष्ट माहिती व चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रास्ताविक प्रफुलचंद राठोड, संचालन स्वप्नील उंदीरवाडे यांनी केले.

टॅग्स :marathiमराठी