शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा मृतदेह घरात, मुलीने केंद्रावर जाऊन सोडवला दहावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि आर्या घरी परतताच मृतदेह घराबाहेर काढण्यात आला.

हरिश सिडामलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आजारपणामुळे वडिलांचे रात्री अचानक निधन झाले. पण पित्याच्या मृत्यूचे दु:ख आवरत सकाळी दहावीचा पेपर सोडवायला गेलेली एक विद्यार्थिनी चामोर्शी तालुक्यात कौतुकाचा विषय झाली आहे. डोळ्यांतील अश्रूंना आवरत तिने मोठ्या हिमतीने बोर्डाच्या परीक्षेचा पूर्ण पेपर सोडवत आपले शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचविले. ही घटना चापलवाडा या गावात घडली. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील घोट या गावापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चापलवाडा गावात राहणारे शेतकरी सुनील दुंदलवार (४५ वर्ष) यांचे गेल्या सोमवारी रात्री उशिरा आजारपणामुळे निधन झाले. या घटनेमुळे दुंदलवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. चापलवाडा गावातही शोककळा पसरली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार असताना वडिलांच्या निधनाने दहावीत असलेल्या आर्या दुंदलवार हिच्यावर मोठे संकट कोसळले. परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि आर्या घरी परतताच मृतदेह घराबाहेर काढण्यात आला.

परीक्षा केंद्र तीन किलोमीटर अंतरावर -   चापलवाडा गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मक्केपल्ली गावातील साईनाथ विद्यालयात आर्या दहावीत शिकत आहे. यावर्षी कोविडमुळे शिक्षण मंडळाने स्थानिक शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवली आहेत. त्यामुळे आर्याला तिच्या शाळेत जाऊन पेपर द्यावा लागला. या दुःखद परिस्थितीतही आर्याने गावातील इतर विद्यार्थ्यांसह तीन किलोमीटर अंतरावरील शाळेत पोहोचून दहावी बोर्डाचा पहिला पेपर सोडवला.

 नवीन आदर्शदायी  उदाहरण आर्याची आई आणि नातेवाईकांनी तिला समजावून सांगितले आणि तिची भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी तिला प्रथम परीक्षेचा सामोरे गेले पाहिजे. तिचा पेपर झाल्याशिवाय वडिलांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. यामुळे आर्याला प्रोत्साहन मिळाले आणि तिने केंद्र गाठून आधी पेपर दिला. आर्याच्या या धाडसी निर्णयाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा