शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलातून जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:09 IST

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला.

ठळक मुद्देदेसाईगंजातील प्रकार : अवजड वाहनांच्या केबिनवर बसतात मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून शहरांच्या दोन्ही बाजूला आवागमन करण्यासाठी रेल्वेने भूयारी पुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु येथून अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक केली जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डांबर मिश्रीत गिट्टी चुरीने भरलेला ट्रक या भुयारी मार्गावरुन नेण्यात आला. संपूर्ण ट्रकमध्ये गिट्टी भरली असतानाच केबिनच्यावर मजुरांना बसवून जीवघेणा प्रवास करण्यात आला.देसाईगंज येथील रेल्वेभुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच ओव्हर हेड ब्रेकर लावलेले आहेत. या ब्रेकरची उंची जमिनीच्या ब्रेकरपासून साडेतीन मीटर उंचीवर आहे. बुधवारी डांबरमिश्रीत बारीक गिट्टी भरलेला ट्रक या ठिकाणावरुन जात असताना वर बसलेल्या मजुरांना पूर्णपणे कॅबीनमध्ये झोपावे लागले. अनावधानाने जर चालकाची जराशी चूक झाली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. विशेष म्हणजे, भूयारी पुलाची निर्मिती अवजड वाहनांच्या आवागमनासाठी झालेली नसून पादचारी, दुचाकी, चारचाकी व लहान गाड्यांसाठी आहे. परंतु येथून अवजड वाहने सर्रास चालविली जात आहेत. परिणामी इतरही वाहतूक प्रभावित होत आहे. काही तांत्रिक कारणाने वाहन मागे आल्यास मोठा अनर्थही घडू शकतो.यापूर्वी अवजड वाहन टाकण्यात आल्याने एक-दोन ठिकाणी या मार्गाची तोडफोड झाली आहे. अवजड वाहने जाण्यासाठी बायपास मार्गाची सोय असूनसुद्धा अवजड वाहन चालक शॉर्टकटच्या नादात दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. संबंधित विभागाने या भुयारी पुलाखालून कोणती वाहने जाणार याचा स्पष्ट निर्देश असलेले सुचना फलक फाटकाच्या दोन्ही बाजूला लावावे.या सूचनांचे पालन न करणाºया वाहनावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.