शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवसानंतरही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:04 IST

जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामसभांची नुकसानभरपाई द्या : धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन करताना कायदेशिर बाबींचे पालन होत नसल्यामुळे ती लिज रद्द करावी, या लिजमुळे ग्रामसभेच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय सदर कंपनीचा प्रस्तावित चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉयड स्टिल कंपनीचा लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यात उभारून तिथे स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या, त्यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशीही उपोषणकर्त्यांची मागणी आहे. मात्र त्यांच्या उपोषणाला ५० दिवस पूर्ण झाले तरी अजून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांच्या वतीने सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान जिल्हा ग्रामसभा महासंघाचे देवाजी तोफा व इतर सहकारी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे बारसागडे यांनी सांगितले.प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीतीलसदर उपोषणकर्त्यांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाच्या नाही तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहेत. त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. याशिवाय त्यांनी न्यायालयातही जनहित याचिका टाकलेली आहे. त्यावरील निर्णय येईपर्यंत तरी उपोषणकर्त्यांनी वाट पाहून उपोषण मागे घ्यावे. यासाठी तीन-चार वेळा त्यांची समजूत काढली, मात्र उपोषणकर्ते ही बाब समजून घेण्यास तयार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.