शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीही होणार कॅशलेस

By admin | Updated: February 1, 2017 00:43 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरातील १७ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वी रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे.

१७ हजार केसीसी कार्डचे वितरण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रमगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरातील १७ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वी रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे. या कार्डच्या मदतीने शेतकरी खते, बि-बियाणे पॉस मशीनच्या मदतीने खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. खरीप हंगामामध्ये बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कृषी कर्ज घेतात. यापूर्वी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड दिले जात होते. किसान क्रेडीट कार्डसोबत चेकबूकही दिला जात होता. या धनादेशाच्या मदतीने संबंधित शेतकरी त्याला जेवढ्या रकमेची गरज आहे. तेवढीच रक्कम धनादेशाच्या माध्यमातून काढेल त्यामुळे अनावश्यक कामासाठी रक्कम खर्च होाणार नाही. हा या मागे उद्देश होता. मात्र धनादेश वटविण्यासाठी शेतकऱ्याला बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने बहुतांश शेतकरी एकाच वेळी मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम धनादेशाच्या मदतीने काढत होते. या सर्व प्रकारावर आळा घालून शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहारांची सवय लागावी यासाठी बँकेने संबंधित शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मागील वर्षी पाच हजार शेतकऱ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. यावर्षी मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शेतकऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या अंतर्गत कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जाणार आहे. सदर कार्ड हा एकप्रकारचा एटीएम कार्ड असून या कार्डाच्या मदतीने शेतकऱ्याला त्याच्या कर्जाची रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे बँकेच्या रांगेत राहण्याची गरज नाही. त्याचबरोबर सॉप मशीनच्या मदतीने कार्ड स्वाईप करून खते, बि-बियाणे खरेदी करू शकणार आहे. यामुळे शेतकरीही कॅशलेस व्यवहार करू शकणार आहे. शेतकऱ्यांकडे रूपे केसीसी कार्ड उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)कृषी कर्जाचा दुरूपयोग थांबणारशेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वितरण शेतीच्या मशागतीला येणारा खर्च भागविण्यासाठी दिला होतो. मात्र बहुतांश शेतकरी बँकेत चकरा माराव्या लागतात. या त्रासापायी एकाचवेळी कर्जाची रक्कम काढून घेतात. तोपर्यंत शेतीची कामे सुरू झाली राहत नसल्याने कृषी कर्जाच्या रकमेचा उपयोग इतर कामासाठी केला जातो. शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्ड वितरित झाल्यास त्यांना कधीही पैसे उपलब्ध होतील. त्यामुळे ते ज्यावेळी गरज पडेल त्याचवेळी एटीएममधून पैसे काढतील. त्याचबरोबर रूपे कार्डच्या मदतीने कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल. हा मुख्य उद्देश या मागे आहे. मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण केले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रूपे केसीसी कार्डचे वितरण करण्याची योजना पुढे आणली आहे. मागील वर्षी पाच हजार कार्ड वितरित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बँकेने यावर्षी २८ फेब्रुवारीपूर्वी १७ हजार शेतकऱ्यांना रूपे केसीसी कार्डचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन लाभार्थी शेतकऱ्यांनाही रूपे केसीसी कार्ड दिले जाईल.-सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.