शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:58 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.

ठळक मुद्देवर्षभरापासून लाभ नाही : केवळ अर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, मात्र त्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा झाला नाही, अशा शेतकºयांना उच्चदाब प्रणालींतर्गत उच्चदाब लाईन टाकून दिली जात आहे. एप्रिल २०१८ नंतर ज्या शेतकºयांचे अर्ज प्राप्त होत आहेत, त्यांना सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून अर्ज मागविले जात आहेत. कृषीपंपासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून ३ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले. कृषीपंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकºयाला तीन एचपीच्या पंपासाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकºयांना ८ हजार २८० रुपये भरावे लागतात. त्यानंतरच त्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाभरातील १ हजार ८२ शेतकºयांनी डिमांड भरले आहेत.सौर कृषीपंप देण्याची योजना राज्य शासनाने वर्षभरापूर्वी सुरू केली. मात्र अजूनपर्यंत या योजनेंतर्गत अर्ज मागविण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीच नव्हे तर राज्यभरातील एकाही शेतकºयाला वर्षभराचा कालावधी उलटूनही एकही सौरकृषीपंप देण्यात आला नाही. डिमांड भरलेले शेतकरी आपल्याला सौर कृषीपंप कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांसाठी लाभदायकगडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विरळ आहे. अनेक गावे जंगलाने व्यापली आहेत. या जंगलातूनच वीज तारा गेल्या आहेत. वादळवारा झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी घडतात. एकदा वीज खंडीत झाल्यानंतर पुन्हा सुरू होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत सौरकृषीपंप फायदेशीर ठरणार आहे. शेतकºयाला कधीही वीज उपलब्ध होईल.वीज पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात महावितरणचे बरेच कर्मचारी व्यस्त राहतात. त्यातही कृषीपंपासाठी दिलेल्या लाईनवरील बिघाड दुरूस्त करायचा असेल तर शेतात जावे लागते. यामध्ये बराच वेळ व श्रम लागतो. सौर कृषीपंपामुळे हा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे.