शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:45 IST

कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.

ठळक मुद्देनिर्वाहाच्या शेतीला बगल : कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका लागवडीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागवड करीत आहेत. जिल्हह्यात अशा शेतीची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होऊन ती अनेक शेतकऱ्यांमध्ये रुजत आहे.कृषी विकासाच्या दृष्टीने शासनाने विविध योजना राबविण्यास प्राध्यान्य दिल्या ने अनेक शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करीत आहेत. शेतकºयांना अनुदानावर बी-बियाणे, यंत्र, अवजारे तसेच विविध साहित्य दिले जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबिन पिकाची लागवड केली जाते. या पिकांचे उत्पन्न डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यात निघाल्यानंतर भाजीपाला व फळभाज्यांची लागवड शेतकरी करतात. तर बहुतांश शेतकरी कलिंगड, खरबूज, कारले, काकडी, मका आदी नगदी पिकांची लागवड करतात. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सोय करून ही पिके शेतकºयांना सहज शक्य होते. याशिवाय आरमोरी तालुक्यातील वैरागड, मानापूर, देलनवाडी, सुकाळा, मोहझरी व कुरखेडा तालुक्यातील कढोली उराडी, घाटी परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामानंतर शेतकरी भूईमुगाची लागवड करतात. हा परिसर या पिकासाठी एकमेव परिसर आहे. खोब्रागडी व वैलोचना नदीच्या काठावरील शेतांमध्ये हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय भाजीपाला व फळभाजी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी शेतकरी ही विशेष शेती करीत आहेत.नदीचे पात्र व काठावरील भाग पिकांसाठी फायदेशीरदशकापूर्वी बाहेरून आलेले व्यावसायिक जिल्ह्यात ठेका पद्धतीने जमीन घेऊन कलिंगडाची लागवड करीत होते. परंतु आता जिल्हाभरात बऱ्याच ठिकाणी शेतकरी स्वत: कलिंगडाची लागवड करतात. तसेच वैनगंगा, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना नदीपात्रात व खरबुजाची लागवड शेतकरी करीत आहे. सध्या हे पीक निघण्यास सुरूवात झाली आहे. यातूनही बराच नफा मिळतो.कारले व काकडी लागवडीतून भरघोस नफाअनेक समारंभात भाजीपाला व फळभाज्यांची मागणी असते. तसेच बाहेरही निर्यात होत असते. देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, किन्हाळा व गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, राजगाटा परिसर कारले लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय उसेगाव, आंबेशिवणी परिसरात काकडीची लागवड शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात केली आहे. यांतून शेतकरी भरघोस नफा मिळवतात.मका पिकाचा आवाका वाढलाजिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शेतीला पाण्याची सोय नसल्याने शेतकरी मका पीक घेण्यास धजत नव्हते. परंतु आता बऱ्याच ठिकाणी सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी मक्याची लागवड करीत आहेत. सिरोंचा, मुलचेरा, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली तालुका यात आघाडीवर आहे.