शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

एटापल्लीत शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:50 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेतृत्व : एसडीओ कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील काही बाजारपेठसुद्धा बंद होती.मोर्चाचे नेतृत्व विधानसभा उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आ.पेंटारामा तलांडी, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, डॉ.नितीन कोडवते, एटापल्ली तालुका काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गम्पावार, जिल्हा परिषद सदस्य रवी शहा, अहेरीचे तालुकाध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी केले.पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे दर कमी करावे, रेशनसाठी अनुदान न देता धानाचे वितरण करावे, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वृद्ध व निराधार नागरिकांना ९०० रूपये मानधन द्यावे, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरकूल, शेततळे, सिंचन विहिरींचा लाभ द्यावा, धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखा सुरू करावी, पिपली बुर्गी येथे आरोग्य केंद्र सुरू करावे, केरोसीनचे परवाने व वनगौन खरेदी-विक्रीचे अधिकार महिला बचतगटांना द्यावे, रिक्तपदे भरावी, तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, राष्ट्रीयकृत बँकांची संख्या वाढवावी, गट्टा व कसनसूर येथे ३३ केव्हीचे वीज केंद्र सुरू करावे, ग्रामीण भागात बससेवा सुरू करावी, वाळू घाटांचा लिलाव करावा, तेंदूपत्ता मजुरांची थकीत महसुली रक्कम मिळवून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मोर्चादरम्यान सभेचे आयोजन करण्यात आले.सभेदरम्यान मार्गदर्शन करताना आ.विजय वडेट्टीवार यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली. शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे नागरिकांची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली आहे, असा जाब विचारला.एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात बाचाबाचीआ.विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी एटापल्लीचे एसडीएम एस.ए.थेटे यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी उभे राहून निवेदन स्वीकारा, अशी सूचना वडेट्टीवार यांनी एसडीएम यांना दिली. मात्र एसडीएमने उभे राहून निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. पाच पेक्षा जास्त व्यक्ती आतमध्ये कसे आले, असा प्रश्न एसडीएमने उपस्थित केला. तर एसडीएम उभे न राहिल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत टाकला जाईल, अशी तंबी एसडीएम यांना दिली. त्यानंतर एसडीएमने कार्यालयासमोर येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी एसडीएम यांना लोकमतने विचारणा केली असता, आयोजकांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, असे आपल्याला सांगितले असते तर आपण त्यासाठी तयार होतो. कार्यालयात पाच पेक्षा अधिक व्यक्ती येणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप