शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कामाशिवाय परतले शेतकरी

By admin | Updated: July 21, 2016 01:31 IST

शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले

पोटगावचे तलाठी कार्यालय बंद : कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून देण्याची मागणी देसाईगंज : शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले मिळविण्यासाठी शेतकरी व नागरिक तलाठी कार्यालयात दाखल होत आहेत. परंतु साजामध्ये तलाठी हजर राहत नाही. व त्यांचा ठावठिकाणाही दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पोटगाव येथे मंगळवार १९ जुलै रोजी घडला. विविध दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे गावाकडे परतावे लागले. सध्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना मिळणारी कागदपत्रे संगणकीकृत करण्यासाठी आजतागायत सर्वच तलाठ्यांना कामाला लावून ती करवून घेतली व होतही आहेत. त्यामुळे तलाठ्यांची स्थिती ‘तळ्यात, मळ्यात’ अशी होती. परंतु तलाठी साजात हजर राहत नाही व तहसील कार्यालयातही दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखल्यांसाठी वणवण भटकावे लागते. पोटगाव येथे मंगळवारी कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय बंद दिसल्यामुळे रिकाम्या हातानेच स्वगावी परतावे लागले. महिन्यातील बरेच दिवस तलाठी कार्यालय बंद असते. येथील नेमके कामाचे स्वरूप कोणालाच माहित नाही. त्यामुळे अनेकांना काम न होताच खाली हाताने परतावे लागते, असे एका इसमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (तालुका प्रतिनिधी) तलाठी सुटीवर की कर्तव्यावर? पोटगावसह इतरही तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाही. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते तहसील कार्यालयातही आढळून येत नाही. त्यामुळे तलाठी सुटीवर की कर्तव्यावर असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. संबंधित कर्मचारी हजर नसताना नोटीस बोर्डवर अशा सूचना लावणे गरजेचे असते. परंतु सूचना लावल्या जात नाही. तलाठ्यासह कोतवालही कार्यालयात हजर राहत नसल्याने विविध कामासाठी लागणारे दाखले तहसील कार्यालयात संगणकीय कामकाजाचे दिवस, साजात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून द्यावे, अशा सूचना नोटीस बोर्डवर लिहाव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.