शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा बॅरेजचे काम शेतकऱ्यांनी रोखले

By admin | Updated: March 31, 2017 01:10 IST

गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामासाठी वाहतूक करता यावी म्हणून

तहसीलदारांना निवेदन : शेतातून रस्ता तयार केल्याने कंत्राटदारावर कारवाई करासिरोंचा : गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामासाठी वाहतूक करता यावी म्हणून अवैधरीत्या शासनाची परवानगी नसताना शेतकऱ्यांच्या शेतातून रोड तयार करण्यात आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद करून संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोचमपल्ली, वडधम येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून सिरोंचा तहसीलदारांकडे केली आहे. पोचमपल्ली व वडधम येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, आमची शेतजमीन गोदावरी नदीच्या काठावर असून तेलंगणा शासनाकडून सिंचनासाठी मेडिगड्डा बॅरेजचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाकरिता साहित्य ने-आण करण्यासाठी आमच्या शेतातून अवैधरित्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता तयार करण्यासाठी माती, मुरूम आणून जेसीबीच्या सहाय्याने आमची परवानगी न घेताच कंत्राटदाराने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. सदर मेडिगड्डा बॅरेजकरिता ४०० एकर जमीन संपादन करणे तेलंगणा सरकारला आवश्यक आहे. परंतु पोचमपल्ली येथील ४३.३६५ हेक्टर आर जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगून वडधम, आयपेठा येथील शेतकऱ्यांना बैठकीला न बोलविता पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांना बोलावून बैठक आटोपण्यात आली. जमिनीचा मोबदला आजच्या बाजारभावाप्रमाणे देण्याची व अन्य अटी तेलंगणा सरकारने धुडकावून लावल्या आहे, असे या शेतकऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत मोबदल्याबाबत तेलंगणा सरकारकडून व महाराष्ट्र शासनाकडून अंतिम निर्णय होत नाही. तोपर्यंत संबंधित रस्ता काम त्वरीत बंद करून या कामासाठी वापरण्यात येत असलेली पोकलँड व जेसीबी, ट्रॅक्टर व ट्रक आदी जप्त करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)