शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:36 IST

आरमोरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, आदी मागण्यांसह विविध समस्यांना घेऊन काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदन तहसीलदार यशवंत धाईत यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात चर्चा : तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, आदी मागण्यांसह विविध समस्यांना घेऊन काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. सदर निवेदन तहसीलदार यशवंत धाईत यांनी स्वीकारले.नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व उद्योग विरहीत गडचिरोली जिल्ह्याचे धान हे प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. मात्र यंदा अखेरच्या पाण्याअभावी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ.आनंदराव गेडाम पं.स.चे माजी सभापती अशोक वाकडे, जि.प.चे माजी सभापती आनंदराव आकरे, पं.स.चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, आरमोरी विधानसभा युवक काँगे्रसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, आदिवासी आघाडीचे सचिव दिलीप घोडाम, नरेंद्र गजभिये तसेच अशोक भोयर, धनंजय बन्सोड, विश्वनाथ मेश्राम, संजय मडावी, भोलेनाथ धानोरकर, रवींद्र रोहणकर, अशोक बावणे, राधेश्याम मैंद, दत्तू सोमनकार, पुरूषोत्तम मैंद, प्रा.एम.एम.मेश्राम, विजय धकाते, श्यामराव नैताम, योगेंद्र चापळे, चंद्रशेखर किरमे, गोविंदा कुकुडकार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धानपीक एन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. तालुक्यासह जिल्हाभरात धानपिकांना अखेरचे एक पाणी आवश्यक होते. शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी धडपड केली. मात्र प्रयत्न अपुरे पडले.निवेदनातील मागण्याजिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये इतकी आर्थिक मदत जाहीर करावी, कृषी साहित्य, खते, कीटकनाशके व शेती अवजारे यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, शेती व घर बांधकामासाठी अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे, घरगुती व शेतीकरिता वापरात असलेल्या विजेवरील अधीभार व विविध कर कमी करून विद्युत दरवाढ कमी करावे, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, शेतकºयांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम सरसकट सक्तीने कपात न करता पीकविमा इच्छीक करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.