शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: March 18, 2017 02:16 IST

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.

पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्तांचा आरोप : योग्य मोबदल्याशिवाय जमीन न देण्याचा इशारा अहेरी : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. या जमिनीसाठी तेलंगणा सरकार अत्यंत कमी किंमत देऊन फसवणूक करीत आहे. सदर प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे, असा आरोप प्रकल्पग्रस्त वडधम, पोचमपल्ली येथील गावकरी व शेतकऱ्यांनी अहेरी येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. तेलंगणा सरकार सिरोंचा तालुक्यात अडाणी व अशिक्षीत शेतकऱ्यांचा गैरफायदा उठवत आहे. प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून अत्यंत कवडीमोल भाव दिला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तेलंगणा सरकार स्वत:चेच हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर प्रकल्प आमच्यासाठी व कुटुंबासाठी धोकादायक आहे. जमिनीच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे भाव द्यावा, जमिनीची पर्यायी व्यवस्था करावी व प्रकल्पग्रस्त कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच आपण जमीन देऊ, अन्यथा जमिनी देणार नाही, या विरोधात मोठे जण आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वडधम, पोचमपल्ली व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी दिला आहे. वडिलोपार्जीत व चार पिढ्यांपासून वास्तव्यास असलेले गाव तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा प्रकल्पामुळे सोडावे लागणार आहे. कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेलसह सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या सिंचन विहिरी बोअरवेल व इतर सुविधांचाही मोबदला देणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबाला पेन्शन लागू करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली. याबाबतचे निवेदन अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले. पत्रकार परिषदेला सरपंच चंद्रय्या क्रिष्टय्या सिहानिनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेली लिंगय्या, चल्ला शंकरय्या, बंगारू आकुला व्यंकटेना गोरे, श्रीनिवास राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरूपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमूला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)