शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपल बोर कलमात शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: August 2, 2015 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने

आत्मांतर्गत कार्यक्रम : सहा महिन्यानंतर एकही फळ आले नाहीगडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी शेतीत धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने २०१० पासून विविध उपक्रम कृषी विभाग चालवित आहे. याच उपक्रमांतर्गत सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात असलेल्या आत्मा या कृषी विभागाच्या कार्यालयाने जिल्ह्यात सहा हजार कलमांचे वाटप हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना केले. बाराही तालुक्यात या कलमांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल बोरचे उत्पन्न सुरू होईल, अशी माहिती आत्माच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कलमा वितरित करताना दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अ‍ॅपल बोरच्या कलमांची लागवड आपल्या शेतात केली. अ‍ॅपल बोरच्या कलमा पश्चिम महाराष्ट्रातील पुरवठादाराकडून मागविण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. आत्माचे प्रकल्प संचालक हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या हितसंबंधातून हा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. कलमा लावून त्याची योग्य पध्दतीने निगा राखल्यानंतरही सहा महिने उलटल्यावर बहुतांश झाडाला बोर लागलेच नाही. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आत्माच्या कार्यालयाकडे या बाबतची मौखिक तक्रार केली. आता प्रकल्प संचालकांनी हात वर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याची जमीन चुनखडीचे प्रमाण अधिक असलेली आहे. त्यामुळे कदाचित बोराचे उत्पादन आले नसावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आत्माचे संचालक हे कृषितज्ज्ञ असतात. त्यांना जमिनीचा अभ्यास असतोच. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीचा पूर्व अभ्यास न करता केवळ सरकारी अनुदान खर्च करण्यासाठी त्यांनी अ‍ॅपल बोरचा हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सरकारी निधीचा अपव्यय केला, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या कलमा घेतल्या त्यांनाही कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यांचीही फार मोठी फसवणूक आत्माच्या अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या कलमांचा पुरवठादार व गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्यावर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोणताही अधिकारी येऊन शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीच्या नावावर नानाविध उपक्रम सांगत असतो व शेतकरी नागविला जातो, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारे झाड म्हणून अ‍ॅपल बोरचे वितरण मागील वर्षी करण्यात आले. या अ‍ॅपल बोरला वर्ष उलटूनही फळे लागली नाही. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात चुनखडीचे प्रमाण असावे, त्यामुळे झाडाला फळे लागली नाही. काही झाडांना फळे येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.- अनंत पोटे, प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली