शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शेतकरी कुटुंबाने राष्ट्रपतींकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

By admin | Updated: September 29, 2016 01:35 IST

आरमोरी तालुक्याच्या वडधा, बोरी येथील बोगस शेतीविक्री प्रकरणात बळी पडलेल्या व गेल्या तीन वर्षांपासून स्वत:च्या शेतीसाठी न्यायालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या सूर्यभान येवले,

न्यायालयात धाव घेऊनही येवले कुटुंबीयांना न्याय नाही : बोगस विक्रीपत्र तयार करून २ हेक्टर ५२ आर शेतजमीन हडपल्याचे प्रकरणजोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या वडधा, बोरी येथील बोगस शेतीविक्री प्रकरणात बळी पडलेल्या व गेल्या तीन वर्षांपासून स्वत:च्या शेतीसाठी न्यायालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या सूर्यभान येवले, मुरलीधर येवले अशा चार भावंडाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. वडसा साजा क्रमांक १५ अंतर्गत टेंभाचक येथील भू मापन क्रमांक १११ खाते क्रमांक १०६ वरील दोन हेक्टर ५२ आर शेतजमीन लालाजी येवले (मयत) भाऊ सूर्यभान येवले, श्यामराव येवले, मुरलीधर येवले या शेतकरी भावंडांनी विकून दुसरीकडे जास्त जमीन विकत घेण्यासाठी १४ मार्च १९८० रोजी येथीलच मुकूंदा गणुजी कोलते सोबत १८ हजार रूपयात सौदा करून पाच हजार रूपये बयाना घेण्यात आले. ११ फेब्रुवारी १९८९ ला विक्रीपत्र करण्याचे ठरले. मात्र विक्रीची तारीख जाऊनही जमीन खरेदीकर्ते मुकूंदा कोलते यांनी उर्वरित रक्कम देऊन विक्रीपत्र आपल्या नावे करून घेण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकरणी सहा महिन्यानंतर आॅगस्ट १९८१ मध्ये न्यायालयात केस दाखल करण्यात आली. न्यायालयाने २६ मार्च २०१४ ला मुकूंदा कोलते यांचे नावे गैरकानुनी विक्री करून दिली. उर्वरित १३ हजार रूपये न्यायालयात भरण्यात आले. मात्र आजपर्यंत सदर रक्कम येवले कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. उलट स्वत:च्या जमिनीवर पाय ठेवणाऱ्या या गरीब शेतकऱ्यांना पोलिसांचे फटके खावे लागले. शेतजमीन बळजबरीने हिरावून घेतल्याने येवले कुटुंब भूमिहिन झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात न्यायालयात केस दाखल करूनही तीन वर्षांपासून न्याय व्यवस्थेकडून येवले कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रपतींकडे अखेर इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. कोर्ट स्टॅम्पवर पाच हजार बयाना रक्कम घेताना ११ फेब्रुवारी १९८१ ला उर्वरित १३ हजार रूपये देऊन विक्रीपत्र मुकूंदा कोलते यांच्या नावे करून द्यायचे, विक्री करून देण्यास शेतीमालक तयार नसल्यास शेती घेणारा त्या तारखेपासून शेतजमिनीवर ताबा करेल. खरेदी करणाऱ्याने पैसे देऊन विक्री केली नाही तर सदर सौदा रद्द केला जाईल, असे स्टॅम्पमध्ये नमूद केले होते. (वार्ताहर)