शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 28, 2016 01:10 IST

गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे.

सिरोंचात निघाला मोर्चा : मेडिगट्टा-कालेश्वर धरण कामाचे सर्वेक्षण बंद करासिरोंचा : गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे. या कामाकरिता गेल्या काही दिवसांपासून सिरोंचापासून २२ किमी अंतरावर पोचमपल्ली भागात सर्वेक्षण दोन्ही राज्याचे अधिकारी संयुक्तपणे करीत आहे. या प्रकल्पामुळे २२ गावे बाधित होणार असल्याने या भागातील शेतकऱ्याचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. या विरोधात बुधवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा नेऊन रोष व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व मेडिगट्टा धरण विरोधी संघटनेच्या किसान आघाडी संघटनेचे अध्यक्ष मधुसुधन आरवेली, कोमरे वेंकन्ना, लग्गा सत्यम, भंडारी समय्या, नागेश गागापुरम, सतीश भोगे आदींनी केले. यावेळी मोर्चेकऱ्यांची माजी आ. पेंटारामा तलांडी यांनीही भेट घेऊन मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला. सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नद्या वाहतात. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी सिरोंचा तालुक्यातील २२ ते २३ गावांना पुराचा फटका बसतो. तेलंगणाच्या प्रस्तावित असलेल्या मेडिगट्टा-कालेश्वर धरणामुळे या परिसरातील नलीकुडा, कोत्तापल्ली, चुनामचन, वागू, पोचमपल्ली, वडधम, आईपेठा, तुमनूर, पेंटीपाका, लंबडपल्ली, क्रिष्णापूर, आरडा, राजन्नापल्ली, जानमपल्ली, चिंतलपेठ, रामक्रिष्णापूर, सिरोंचा, गर्कापेठा, गोल्लागुडम, टेकडाचेक, जाफ्राबाद चेक, मुकेला आदी २१ गावांतील अंदाजे ३०७० एकर (१२२७.३१ हेक्टर आर) शेत जमिनीसह घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या धरणामुळे होणार आहे. या भागात कापूस, ज्वारी, मिरची आदी पिके घेतले जातात. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होणार असल्याचे या मोर्चाला मार्गदर्शन करताना शेतकरी नेते मधुसुदन आरवेली यांनी सांगितले. या मोर्चादरम्यान के.सी.आर. हाय हाय, सिरोंचा को डुबने से बचाओ, पालकमंत्री निंद से जागो, मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बंद करा, महाराष्ट्र गर्व्हनर हाय हाय, जय जवान, जय किसान, वंदे मातरम, गर्व्हनर को हटाओ सिरोंचा बचाओ, अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या. मोर्चा स्थानिक शेतकरी भवनातून तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शेकडोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)