शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ नाही

By admin | Updated: August 24, 2014 00:00 IST

आरमोरी पं. स. अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर ८५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. आरमोरी पं. स. अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वडधा, देऊळगाव व आरमोरी कृषी मंडळ क्षेत्रात या बियाणांचे वाटप करावे,

वैरागड : आरमोरी पं. स. अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर ८५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. आरमोरी पं. स. अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वडधा, देऊळगाव व आरमोरी कृषी मंडळ क्षेत्रात या बियाणांचे वाटप करावे, असे निर्देश होते. परंतु आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सुटीवर आलेल्या धान्य बियाणांचा लाभ झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहिले आहेत.बियाणांचा लाभ न झाल्याने योजनेत गैर व्यवहार झाला असल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सुटीवरचे बियाणे अत्यल्प असले तरी त्या मंडळ क्षेत्रात हे बियाणे सेवा सहकारी संस्थांच्यामार्फतीने वाटप करण्यात येतील, अशी सूचना शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु सुटीवर आलेल्या धान्य बियाणांचा लाभ चालू वर्षात शेकऱ्यांना मिळाना नाही. आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी केली होती. परंतु केवळ ८५ क्विंटलच बियाणे मंजूर करण्यात आले होते. या बियाणांचा तालुक्यातील अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ झाला. ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदानावरील बियाणे पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाच्या या अनुदान योजनेविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. परिणामी बियाणांवरील अनुदान सुटीची योजना फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना बियाणांवरील अनुदान योजनेचा लाभ मिळाला. मात्र गरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.सुटीवर आलेल्या धान्य बियाणांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, अशी कुजबुजही अनेक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी या योजनेत गैरव्यवहार केला असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सुटीवर मिळालेल्या धान्य बियाणाची चौकशी करून या प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)