शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी असमाधानी

By admin | Updated: August 26, 2015 01:11 IST

दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे,

लोकमत सर्वेक्षण : शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करू नयेगडचिरोली : दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने लोकमतने गडचिरोली जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये १०० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात प्रत्यक्ष प्रश्नावलीच्या आधारे शेतकऱ्यांशी त्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता शेतीच्या व्यवसायावर समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. विविध उत्पन्न गटातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच विविध वयोगटातील शेतकऱ्यांशीही मुक्त संवाद करण्यात आला. त्यातून पुढे आलेले हे चित्र वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३९६ शेतकरी आहेत. यातील शुन्य ते एक हेक्टर शेती असणारे ४३ हजार ६४९, एक ते दोन हेक्टर शेती असणारे ३६ हजार ३०६ व दोन हेक्टरच्या वर शेती असणारे ३५ हजार ४४१ शेतकरी आहेत. लोकमतने चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज या कमी-अधिक प्रमाणात सिंचन व्यवस्थेची सोय असलेल्या तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची सर्वेक्षणासाठी नमुना म्हणून निवड केली. त्यांच्याकडून १० प्रश्न असलेल्या प्रश्नावलीच्या आधारे चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतून शेतकऱ्यांच्या विविध परिस्थितीचे विदारक वास्तव समोर आले. हे वास्तव राज्यकर्त्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना व्हाव्यात, अशी लोकमतची प्रामाणिक इच्छा यामागे आहे. असा झाला सर्वेक्षणाचा प्रवास३० हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या २० टक्के शेतकऱ्यांचा सर्वेक्षणात सहभाग होता. ३० ते ५० हजारापर्यंत उत्पन्न असणाऱ्या २५ टक्के शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. एक लाख ते दीड लाख उत्पन्न असणाऱ्या १५ टक्के शेतकऱ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. दीड ते दोन लाख उत्पन्न असणारे १० टक्के व दोन ते तीन लाख उत्पन्न असणारे ८ टक्के शेतकरी या सर्वेक्षणात सहभागी झाले.