शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडाच्या शेतीकडे वळतोय शेतकरी

By admin | Updated: November 9, 2014 23:20 IST

धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक

गडचिरोली : धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जाणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्याय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल, तुर, हरभरा, मम्मा, ज्वारी, गहू, लाखोळी, तीळ, करडई, भूईमूंग, मोहरी आदी प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र या पिकांपासून पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला लाभ मिळत नाही. कधीकधी तोट्याचाही सामना करावा लागतो. दरवर्षीच्या या कटकटीला त्रासून जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळत चालला आहे. बाजारपेठेत कलिंगडाला चार महिने मागणी राहते व चांगला भाव मिळत असल्याने दरवर्षी कलिंगडाच्या शेतीचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील वर्षी सुमारे ७०० हेक्टरवर कलिंगडाची शेती करण्यात आली होती. यावर्षी १ हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कलिंगडाची शेती केली जाणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कलिंगडाची लागवड सध्या सुरू झाली असून दीड महिन्यात हे पीक हातात येणार आहे. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९० टक्के राहत असल्याने उन्हाळ्यात या फळाची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. ज्या शेतीला उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाठिकाणी हे पीक घेतले जाते. पूर्वी या पिकाची लागवड काही विशिष्ट शेतकरीच करीत होते. त्यांच्याकडून अनुभव घेतल्यानंतर स्वत:च शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करणे सुरू केले आहे. काही शेतकरी दुसऱ्याला कसण्यासाठी देत आहेत. यातून सदर शेतकऱ्यालाही अधिकचा पैसा मिळत आहे. कलिंगडाची लागवड उन्हाळभर चालत असल्याने यातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे स्थलांतरीत होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. विशेष म्हणजे कलिंगडाच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांमधील उत्साह वाढीस लागला आहे. (नगर प्रतिनिधी)