शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

कुटुंब नियोजनात आरमोरी आघाडीवर

By admin | Updated: June 13, 2015 01:54 IST

कुटुंब नियोजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे.

दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट : एटापल्ली तालुका कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत माघारलादिलीप दहेलकर गडचिरोलीकुटुंब नियोजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. मात्र साक्षरता कमी असलेल्या दुर्गम व आदिवासी भागात कुटुंब नियोजनाच्या कार्यकमाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांच्या आकडेवरीलवरून कुटुंब नियोजन कार्यक्रमात आरमोरी तालुका आघाडीवर आहे. तर दुर्गम आदिवासीबहुल एटापल्ली तालुका माघारला असल्याचे दिसून येते.२०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून आरमोरी तालुका शस्त्रक्रियेत आघाडीवर तर एटापल्ली तालुका पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होते. २०१३-१४ या वर्षात गडचिरोली तालुक्याला एकूण ९४४ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात ३१४ पुरूष व ४५२ स्त्रिया असा एकूण ७६६ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८१.४४ आहे. वडसा तालुक्याला ५२७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष १३० व महिला ३१६ असे एकूण ४४६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८४.६२ आहे. आरमोरी तालुक्याला ६०२ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात ३१९ पुरूष व ३३१ स्त्रिया अशा एकूण ६५० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०७.९७ आहे. कोरची तालुक्याला २७४ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष १०६ व स्त्रिया १२० अशा एकूण २२६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८२.४८ आहे. कुरखेडा तालुक्याला ५५५ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात २५६ पुरूष व २८१ स्त्रिया अशा एकूण ५३७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९६.७५ आहे. चामोर्शी तालुक्याला एक हजार ४० शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष २७० व स्त्रिया ८८१ अशा एकूण एक हजार १५१ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ११० आहे. मुलचेरा तालुक्याला ३३७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ६२ व स्त्रिया २९२ अशा एकूण ३५४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी १०५ आहे. अहेरी तालुक्याला ६६३ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ३८२ व स्त्रिया २९१ अशा एकूण ६७३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०१.५० आहे. सिरोंचा तालुक्याला ४६२ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष २१० व स्त्रिया २६७ अशा एकूण ४७७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी १०३.२४ आहे. धानोरा तालुक्याला २०१३-१४ या वर्षात ४८८ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात पुरूष ३१७ व स्त्रिया १३० अशा एकूण ४४७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ९१.५९ आहे. भामरागड तालुक्याला २१९ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यात केवळ १९५ पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याची टक्केवारी ८९ आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत आघाडीवर असल्याचे दिसून येते.