शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकाच्या उत्पन्नात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:18 IST

चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा आहे. येथील शेतजमीन खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : लागवडीचा खर्च भरून निघेना

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा आहे. येथील शेतजमीन खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. दरवर्षीच्या रबी हंगामात दाणे भरीत असताना वातावरणात झालेला बदल व अवकाळी पावसाचा फटका बसत असल्याने खरीप पेक्षा रबी हंगामातील उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता अधिक असते. यंदाच्या रबी हंगामात चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे, या तालुक्यात लाखोळी व तूर हे पीक प्राधान्याने घेतले जाते. सदर दोन्ही पिके ऐन गर्भात असताना ढगाळी वातावरणाचा फटका या पिकांना बसला. परिणामी कडधान्याचे उत्पादन २५ टक्के झाल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मजुरांच्या मजुरीचा खर्च तसेच लागवडीचा इतर खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या वैरणाची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कडधान्य पिकाची मळणी केली. मळणीचाही खर्च आता दिवसेंदिवस वाढत असून रबी पिकातील लागवड शेतकºयांना आणखी संकटात टाकत असल्याचे दिसून येते.