शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

बनावट आधार कार्ड बनवून प्लॉट विकणारी टाेळी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

आपल्या प्लॉटची परस्पर कोणीतरी विक्री केल्याचे लक्षात आले त्यावेळी मूळ मालक खोब्रागडे यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी गडचिरोली पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट आधार कार्डवर लावलेला फोटो कोणाचा आहे याचा शोध घेतला. खबरींच्या माहितीवरून तो चंद्रपूर येथील व्यक्तीचा असल्याचे दिसले. त्यानुसार त्या व्यक्तीचा माग काढत मोठ्या शिताफीने तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा गडचिरोलीतील प्लॉट, त्यांचे बनावट आधारकार्ड बनवून परस्पर विकल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी चंद्रपूर येथील तिघांना अटक करण्यात आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे याच पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक होण्याचा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या उपलवाडी भागात राहात असलेले किशन लक्ष्मण खोब्रागडे (७४ वर्षे) यांनी गडचिरोली येथे १९८७ मध्ये २७४.६२ चौरस मीटर प्लॉट विकत घेतला होता. तो प्लॉट त्यांना विकायचा असल्याने तीन वर्षांपूर्वी त्यांनी तिथे तसा बोर्ड लावला होता. त्याचा फायदा घेत चंद्रपूर येथील आरोपी महेंद्र नामदेव गेडाम (४४ वर्षे, रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) आणि चंद्रशेखर रामलखन घुगुवा (३० वर्षे, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) यांनी अशोक सोनाजी इंगळे (५८ वर्षे, रा.बल्लारशा बायपास रोड, चंद्रपूर) यांना आपला प्लॅन सांगितला. त्यानुसार इंगळे यांनी आपले आधार कार्ड गेडाम व घुगुवा यांना दिले. त्यांनी त्यावरून प्लॉट मालक किशन लक्ष्मण खोब्रागडे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड बनविले. एवढेच नाही तर त्या प्लॉटची त्यांनी दोन जणांना परस्पर विक्रीही केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट  झाले.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या परिसरातील प्लॉटच्या विक्रीवर बंदी घातल्याने आरोपींचा याच पद्धतीने इतरांची फसवणूक करण्याचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. याप्रकरणी अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.आधारवरील फोटोवरून काढला मागआपल्या प्लॉटची परस्पर कोणीतरी विक्री केल्याचे लक्षात आले त्यावेळी मूळ मालक खोब्रागडे यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी गडचिरोली पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट आधार कार्डवर लावलेला फोटो कोणाचा आहे याचा शोध घेतला. खबरींच्या माहितीवरून तो चंद्रपूर येथील व्यक्तीचा असल्याचे दिसले. त्यानुसार त्या व्यक्तीचा माग काढत मोठ्या शिताफीने तीनही आरोपींना अटक करण्यात आली. तूर्त त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले यांनी सांगितले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी