शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कीड नियंत्रणात कृषी विभागाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:44 IST

कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात ...

कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात कृषी सेवकापासून ते पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी, कृषी विकास अधिकारी तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अशा कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना पुरवून मशागत, कीड नियंत्रणाबाबत यथायोग्य माहिती पुरविण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली आहे. यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित ज्ञान असलेल्या व त्याचे शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच या विभागात नियुक्त्या देण्यात येत आहेत. असे असताना मागील कित्येक वर्षांपासून मावा, खोडकिडा, तुडतुडा तर कधी कडा करप्यामुळे उभे धानपीक नष्ट होण्याचा सिलसिला सुरूच आहे.

कृषी विभागाचे नियोजन फेल का ठरते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. कृषी विभागात या क्षेत्रातील पारंगत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या ज्ञानाचा कवडीचाही फायदा होणार नसेल, तर संबंधित विभागाची निर्मिती कशासाठी, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेले बी-बियाणे, रासायनिक खते यांचा योग्य वापर करण्यासंदर्भात कृषी विभागाचे यथायोग्य मार्गदर्शन लाभणे अपेक्षित आहे. किती कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून पीक रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. याचा लेखाजोखा तपासणे आता गरजेचे झाले आहे.