शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

प्रचलित पाणी पुरवठ्यात दोष

By admin | Updated: April 5, 2015 01:53 IST

जिल्ह्यात १४०० ते १५०० मिमी पाऊस दरवर्षी सरासरीने पडतो. परंतु या पावसाचे पाणी कुठेही साठवून ठेवता येत नाही.

गडचिरोली : जिल्ह्यात १४०० ते १५०० मिमी पाऊस दरवर्षी सरासरीने पडतो. परंतु या पावसाचे पाणी कुठेही साठवून ठेवता येत नाही. वनकायद्यामुळे या जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नद्यांवर पाणी पुरवठा योजना अंवलंबून असून यावर असलेल्या पाणी वितरण पद्धतीतही मोठ्या प्रमाणावर दोष निर्माण झाले आहेत. हे दोष दूर करून सुदृढ पाणी वितरण प्रणाली निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी सरकारी यंत्रणेनेही पुढाकार घेण्याची गरज आहे.गडचिरोली जिल्ह्यात १० मोठ्या नद्या आहेत. यामध्ये गोदावरी, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा, वैनगंगा, कठाणी, खोब्रागडी, गाढवी, सती आदी नद्यांचा समावेश आहे. या नद्यांवर अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नदीच्या काठावर विहीरस्वरुपाची टाकी तयार करून त्याचे पाणी फिल्टर प्लॉटमध्ये आणल्या जाते व तेथून त्याचे वितरण पाईपलाईनद्वारे करण्यात येते. यातील मोठ्या गावांमध्ये फिल्टर प्लाँटची व्यवस्था आहे. पाणी वितरणाची ही पद्धत जिल्ह्यात सर्वत्र आहे. या वितरण व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेल्या पाईप हे बिडाचे असून अनेक पाणी पुरवठा योजनेची वितरण व्यवस्था ही २५ ते ३० वर्षाची जुनी आहे. त्यामुळे या वितरण व्यवस्थेसाठी असलेले पाईप अनेक ठिकाणी फुटलेले व छिद्र पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पाईपला आतून भागात खराब झालेले आहेत. जमिनीत राहून जंगही त्यावर चढलेला आहे. या जुन्या वितरण प्रणालीची आता नव्याने पुनर्बांधणी करण्याची नितांत गरज आहे. परंतु यासाठी ग्रामपंचायती, नगर पालिका यांच्याकडे आर्थिक तरतुद नाही. त्यामुळे जुन्याच पाईप लाईनच्या भरवशावर वितरण व्यवस्था चालविली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी ही जुनी पाईपलाईन वारंवार फुटून दुषित पाण्याची समस्याही निर्माण होते. वितरण व्यवस्थेसाठी वापरण्यात येणारी पाणी टाकी वर्षातून एक ते दोनच वेळा साफ केली जाते. काही ठिकाणी ही साफही केल्या जात नाही. शहराचे नागरिकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने आता काही ठिकाणी वार्डातील बोअरवेलवर मोटार बसवून जुन्या पाईपलाईनला सदर नवीन विस्तारीत कनेक्शन जोडण्याचे काम अनेक ठिकाणी केले जाते. त्यामुळे अशा वितरण प्रणालीत पाण्याच्या शुद्धतेचे महत्त्व गौण ठरत आहे. या संपूर्ण व्यवस्थेत नवीन बदल आवश्यक असून ज्या गावच्या पाणी पुरवठा योजना जुन्या झाल्या आहेत. त्या नवीन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा व निधी देण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक नळ याच्यावरही नियंत्रण ठेऊन त्यातही दुरूस्ती करण्याची गरज आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये हातपंपाचे पाणीही वापरतात. ही या भागातील प्रचलित पाणी वितरण प्रणाली आहे. यातील अनेक हातपंपाचे पाणी पिण्यास योग्य नाही. तरीही त्याचा वापर पिण्यासाठी पाणी म्हणून केला जातो. काही गावात सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. दुर्गम गावांमध्ये झरे व नाले यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. काही गावांमध्ये नदीवरून माचाद्वारे पाणी आणून त्याचाही वापर केला जातो. या सर्व प्रचलित पाणी वितरण पद्धती असल्या तरी आता पाण्यासाठी येवढा वेळ खर्च करणे सर्वसामान्य माणसाला परवडत नसल्याने या संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्आढावा घेऊन बोअरवेल मोटार बसवून दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात सौरऊर्जेच्या भरवशावर निर्माण केली जात आहे. तसेच काही विहिरींवर मोटारी बसवून त्याचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात पुरवठा केले. (जिल्हा प्रतिनिधी)