शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाकडून युवतीचे शोषण

By admin | Updated: August 26, 2015 01:20 IST

येथील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाविरोधात आरमोरी पोलिसांनी पीडित युवतीच्या...

आरमोरी ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी पोलीस शिपाई फरारआरमोरी : येथील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाविरोधात आरमोरी पोलिसांनी पीडित युवतीच्या तक्रारीवरून मंगळवारी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी पोलीस शिपाई फरार असून आरमोरी पोलीस त्याच्या मागावर आहेत.विनोद शांताराम बावणे रा. आरमोरी असे आरोपीचे नाव असून तो गडचिरोली पोलीस विभागात विशेष अभियान पथकात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पोलीस शिपाई विनोद बावणे व माझी अनेकदा गाठभेटही झाली. दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून विनोदने आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. कालांतराने मी गरोदर राहिले. दरम्यान आपल्याला आताच अपत्य नको, असे म्हणून विनोदने मला २०११ मध्ये गर्भपाताची गोळी दिली. त्यानंतर विनोद २०१२ पर्यंत अहेरीला वास्तव्याने राहू लागला. पुन्हा तीन महिन्यानंतर आरमोरीत आम्हा दोघांची भेट झाली. त्यानंतर विनोदने माझ्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे कमी केले. फेब्रुवारी महिन्यात विनोदची गडचिरोली येथे बदली झाली. त्यानंतर अचानक ६ मे २०१५ मध्ये विनोदचे दुसऱ्या एका मुलीशी लग्न झाल्याचे कळले. तेव्हा आपण त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा शोधही घेतला. मात्र ना त्याच्याशी संपर्क झाला व तो भेटलाही नाही. प्रेमभंग झाल्यानंतर माझे मानसिक संतुलन पूर्णत: ढासळले. पोलीस शिपाई विनोद बावणे याचेकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आपण अ२२ाईवडिलांसोबत थेट चामोर्शी पोलीस स्टेशन गाठले व तेथे रितसर विनोदच्या विरोधात तक्रार दाखल करीत असल्याचे पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)