शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

केजीबीवींवर पावणेतीन कोटींचा खर्च

By admin | Updated: May 4, 2015 01:35 IST

पाच तालुकाच्या ठिकाणी असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या एकूण ७३६ विद्यार्थिनींच्या सोयीसुविधांवर ...

गडचिरोली : पाच तालुकाच्या ठिकाणी असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या एकूण ७३६ विद्यार्थिनींच्या सोयीसुविधांवर २०१४-१५ या वर्षात एकूण २ कोटी ८८ लाख ५० हजार रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती जि.प. शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शाळाबाह्य, अपंग, निराधार व अनाथ विद्यार्थिनीसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी या हेतूने शासनाच्या वतीने सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी व धानोरा या पाच तालुकास्थळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करण्यात आले आहे. सदर पाचही बालिका विद्यालय जि.प. शिक्षण विभागामार्फत चालविले जाते. पाचही बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींची प्रवेश क्षमता ७५० आहे. २०१४-१५ या वर्षात इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या पाचही शाळा मिळून ७३६ विद्यार्थिनी दाखल झाल्या होत्या. या शाळातील विद्यार्थिनींना भोजन, निवास व्यवस्था आदींसह कपडे, पुस्तके व इतर दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा पुरवठा शिक्षण विभागाच्या वतीने शाळांमध्ये करण्यात आला. पाचही शाळातील विद्यार्थिनी निवासी राहून चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)