शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, नाली स्वच्छतेवर चार लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:35 IST

आॅनलाईन लोकमतवैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख २६ हजार ८२२ रूपयांचा खर्च केला असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र गावात स्वच्छतेचे कुठलेही काम झाले ...

ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : सफाई कामात गैरव्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप; चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतवैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख २६ हजार ८२२ रूपयांचा खर्च केला असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र गावात स्वच्छतेचे कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे रस्ते, गटार स्वच्छतेच्या कामात ग्रामपंचायतीने आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप नागरिकांनी मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरली.एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीतील सर्व निधीचा जमा खर्च ५ डिसेंबरच्या ग्रामसभेत सादर करण्यात आला. या अर्धवार्षिक जमाखर्चात रस्ते, गटार, साफसफाईच्या कामावर १ लाख ५७ हजार ३२२ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच नालीतील गाळ फेकण्याच्या कामावर २ लाख १९ हजार ५०० रूपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे. त्यातही गाळ फेकणाºया ट्रॅक्टर मालकाचे पुन्हा ५० हजार रूपयांचे देयक अदा करणे शिल्लक असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले. यावर गावकºयांनी तीव्र आक्षेप घेऊन वैरागड व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया पाटनवाडा, मेंढेबोडी या गावातील अनेक नाल्या तुंबल्या असताना रस्ते व नाली सफाईवर सहा महिन्यात सव्वाचार लाखांचा खर्च कसा झाला, असा सवाल ग्रामस्थानी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना केला. सदर खर्च हा ग्रामसभेत नामंजूर करून या प्रकरणाची चौैकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली.एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या सहा महिन्यांत नाल्यातील गाळ उपसणे आणि तो ट्रॅक्टरद्वारे बाहेर फेकण्याच्या कामावर २ लाख ७० हजार रूपयांचा खर्च दाखविण्यात आला. गाळ फेकण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाली तर हा गाळ नेमका कोठे फेकण्यात आला? याबाबत डम्पिंग ग्राऊंड नेमके कुठे आहे, ते दाखवा, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. मात्र नागरिकांना या ग्रामसभेत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. रस्ते व नाली सफाईच्या कामात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाला असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. यावेळी वैरागड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाणी प्रश्नावर गदारोळवैरागडच्या ग्रामसभेत पाणी प्रश्नावर प्रचंड गदारोळ झाला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तीन ते चार दिवसाआड नळाला पाणी येतो, नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही. नळाला टिल्लूपंप लावणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नागरिकांनी सरपंच व उपसरपंचाला कोंडीत पकडले.टीव्ही संच खरेदीच्या मुद्यावर चर्चाशाळा डिजिटल करण्यासाठी शाळांना टीव्ही संच खरेदी न करण्याचे मासिक सभेत ठरले होते. मात्र ग्रा.पं. ने १ लाख २९ हजार रूपयांतून टीव्ही संच खरेदी करून शाळांना पुरविले. या मुद्यावरही चर्चा झाली.