शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाने केला नागरिकांचा भ्रमनिराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:39 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या.

ठळक मुद्देविरोधकांची भावना : सत्ताधाºयांकडून स्वागत;शेतकºयांसाठी अत्यल्प तरतूद

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र लोकांचा या अर्थसंकल्पाने भ्रमनिराश केला, अशी प्रतिक्रिया विरोधी नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प - आ. विजय वडेट्टीवारमागील वर्षी पावणे दोन कोटींच्या घोषणा करण्यात आल्या. त्याचा फायदा शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्येत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद दाखविण्यात आलेल्या असून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असून आकड्यांची जुमलेबाजी आहे. या अर्थसंकल्पात इंफ्रास्ट्रक्चरवर भर दिला. मात्र लघु व मध्यव उद्योगासाठी कमी प्रमाणात तरतूद करण्यात आल्याने रोजगार निर्मितीसाठी याचा उपयोग होणार नाही, परिणामी बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सदर अर्थकसंल्प म्हणजे आकड्यांचा खेळ असून शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.----------------------लोकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प- डॉ. नामदेव उसेंडीकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य व गरीब लोकांच्या हिताचा विचार करण्यात आला नाही. महागाई नियंत्रणात नाही, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उद्योगपतींचे हित जोपासणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात विशेष अशी तरतूद नाही. एकूणच लोकांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केली.----------------------देशाला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प - खा. अशोक नेतेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शीय आहे. सदर अर्थसंकल्प सर्व समाजातील लोकांना व घटकांना पुढे नेणारा तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारा आहे. एकूणच हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी व्यक्त केली.----------------------शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प - अ‍ॅड. संदीप धाईतआंतरराष्ट्रीय नाणे निधी व मुडीज यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्थेद्वारे करण्यात आलेल्या भारतीय विकास प्रवाहातील जनतेचा आर्थिक अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून श्रीमंत व गरीब यांच्यात वृंदावलेली आर्थिक दरी भयावह परिस्थिती गाठत असताना शासनाने दिलेला हा अर्थसंकल्प शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा व आर्थिक प्रगती साधणारा आहे. मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, छोटे-मोठे व्यापारी यांच्या आर्थिक परिस्थितीत भरीव सुधारणा करण्यासाठी शासनाने केलेला हा साजेसा असा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया कर सल्लागार अ‍ॅड. संदीप धाईत यांनी व्यक्त केली.--------------------अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प- भाग्यश्री आत्रामकेंद्र सरकार गेल्या तीन वर्षात शेतकरी बेरोजगारांना केवळ गाजर दाखविण्याचे काम करीत आहे. या अर्थसंकल्पानेही सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. सामान्य नागरिक, नोकरदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वांच्या खिशाला आणखी कात्री लावण्यासाठी सरकार सज्ज झाल्याचे चित्र या अर्थसंकल्पातून दिसते, अशी प्रतिक्रिया जि.प. च्या बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केली आहे.---------------------आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद नाही- अतुल गण्यारपवारशेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकारने आखल्या आहेत. त्या योजना गरीब शेतकऱ्यांसाठी पूरक नाही. शेतमाल उत्पादनाला पाहिजे त्या प्रमाणात भाव देण्यात योग्य निर्णय शासनाने घेतला नाही. देशातील आदिवासी भागाच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतुद नाही. रोजगार निर्मिती युवक व महिलांच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली आहे.---------------------बेरोजगारांचा अपेक्षाभंग करणारा बजेट - सतीश विधातेसर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना अनुसरून केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प नाही. शेषमध्ये १ टक्क्याची वाढ झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत. दोन कोटी नोकऱ्या देण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र रोजगारात कुठलीही वाढ झाली नाही. नक्षलग्रस्त मागास जिल्ह्यात उद्योग येण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली