शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

चामाेर्शी केंद्रात बालभवन निर्मिती कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

चामाेर्शी : जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने जि. प. शाळांमध्ये फुलाेरा क्षमता विकास कार्यक्रम राबविला ...

चामाेर्शी : जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने जि. प. शाळांमध्ये फुलाेरा क्षमता विकास कार्यक्रम राबविला जात आहे. कुमार आशीर्वाद यांना शिक्षणाविषयी तळमळ आहे. त्यांनी यापूर्वी नाशिक येथे प्रकल्प अधिकारी असताना आश्रमशाळेतील शैक्षणिक समस्यांच्या मुळाशी जाऊन शोधलेली मूळ कारणे शोधून, क्वेस्ट या संस्थेस स्वत: भेट देऊन मूल कसे शिकते हे जाणून घेतले व त्याद्वारे फुलोरा या उपक्रमाची संकल्पना आकारास आली. सध्या हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळेत राबविला जात असून, या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेत बालभवन तयार करणे सुरू आहे.

या बालभवनाच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी चामोर्शी केंद्रात केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे यांच्या मार्गदर्शनात बालभवन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केंद्र शाळा चामोर्शी येथे १३ जानेवारीपासून करण्यात आले. केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविकेतून महत्त्व सांगितले. बालभवनात मुलांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव दिले जातात. या प्रत्यक्ष अध्ययन अनुभवातुन मुले कशी स्वत: शिकतात याची विस्तृत माहिती सांगितली.

कोअर कमिटी सदस्य प्रवीण पोटवार यांनी गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी केलेले प्रयत्न, क्षमता विकास कार्यक्रम, लेखन वाचन कार्यक्रम, ज्ञानरचनावाद, अध्ययनस्तर निश्चिती यातील अनुभव सांगितले व कार्यशाळेला प्रेरित केले. यानंतर प्रत्यक्ष बालभवन निर्मिती कार्यशाळा सुरू करण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षित शिक्षक ईश्वर चौधरी, माधवी धारणी, विज्युधर मडावी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले व शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभाग घेतला.

दिनदर्शिका, हवामान तक्ता, हवामान आलेख, हजेरी तक्ता, अक्षर कार्ड, शब्द कार्ड, अंक कार्ड, वाराची नावे, प्राण्यांची ओळख, वस्तूची नावे, आमचे मित्र/ सखेसोबती, कृती कार्ड, तारेवरची वाचनालय, वॉटर बेल, वाक्य कार्ड, माझे पुस्तक कार्यक्रम, अपूर्णांक चार्ट, चौदाखडी चार्ट, परिवार खेळ, वजाबाकी तक्ता, शब्दशोध पाठी, स्वरचिन्ह, पिन बोर्ड, पुस्तकांचा दवाखाना, सूचना पट्ट्या, मजकूर वाचन, अंकगोल, आदी शैक्षणिक साहित्य या कार्यशाळेत तयार करण्यात आले.

या शैक्षणिक निर्मिती कार्यशाळेत चामोर्शी केंद्रातील ३४ शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचे मार्गदर्शक सुप्रिया काकोती, सारडा यादव, ऐमन साहिन, केंद्र शाळा चामोर्शीचे मुख्याध्यापक प्रभाकर दुधबळे, नूतन शाळा चामोर्शीच्या मुख्याध्यापिका लता नगराळे, सावरहेट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा लोंढे व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.