लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर ते वारसा गावाला जोडणाऱ्या नवीन डांबरी रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. परिणामी रस्त्याच्या बाजूलाच नालीसारखे मोठमोठे खड्डे निर्माण झाले. हे खड्डे धोकादायक ठरणार असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शिरपूरपासून पाच-सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. सदर ठिकाणचा मुरूम तयार झालेल्या नवीन रस्त्याच्या कडा भरण्यासाठी वापरण्यात आला. मुरूम खोदल्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले. या ठिकाणी एखाद्या वाहनाला अपघात झाल्यास सदर मोठ्या खड्ड्यातून वाहन निघणे कठीण होणार आहे. रस्त्याच्या कडा बुजविण्यासाठी त्याच ठिकाणचा मुरूम खोदण्याची तरतूद असली तरी चुकीच्या पद्धतीने मुरूम खोदल्यामुळे आता अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिरपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.वृक्षांची झाली कत्तलजेसीबी लावून रस्त्याच्या लगतचा मुरूम खोदण्यात आल्याने या कामादरम्यान अनेक वृक्षांची कृत्रिमरित्या कत्तल झाली. नालीसारखे मोठे खड्डे पडले. आता जंगलात चरायला जाणाºया गुरांना या खड्ड्यांपासून धोका होणार आहे.
रस्त्याच्या बाजूचा खोदला मुरूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST
शिरपूरपासून पाच-सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूचा मुरूम खोदला. सदर ठिकाणचा मुरूम तयार झालेल्या नवीन रस्त्याच्या कडा भरण्यासाठी वापरण्यात आला. मुरूम खोदल्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले.
रस्त्याच्या बाजूचा खोदला मुरूम
ठळक मुद्देशिरपूर मार्गावर अपघाताची शक्यता : कडा भरण्यासाठी कंत्राटदाराने केला उपद्व्याप