शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय पुलाच्या कामाजवळच रेतीचे उत्खनन

By admin | Updated: July 30, 2015 01:18 IST

महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निर्माणाधीन कामापासून २० फूट अंतरावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे.

इरफान पठाण यांची मागणी : रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी तहसीलदार व तलाठ्यावर कारवाई करागडचिरोली : महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निर्माणाधीन कामापासून २० फूट अंतरावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे. या कामाकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान पठाण यांनी केला आहे. गोदावरी नदीत अवैधरीत्या रेती उत्खनन करून परप्रांतात रेतीची वाहतूक करण्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी सिरोंचा येथील तहसीलदार, तलाठी व कंत्राटदार कारवाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इरफान खान यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.२७ जुलै रोजी आपण व राकाँचे कार्यकर्ते मिळून रेतीची अवैध वाहतूक करणारे एकूण १५ ट्रक आलापल्ली मार्गावर अडविले. याबाबत आपणास माहिती देऊन धाड टाकण्याची विनंती केली. त्यानुसार आपण ट्रक जप्तीची कारवाई केली. मात्र सदर प्रकरणात सिरोंचाचे तहसीलदार, नगरमचे तलाठी यांचा सहभाग आहे. रेतीघाट कंत्राटदाराला यांच्याकडून अभय मिळत आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या नगरम घाटातून लाखो ट्रक रेती अवैधरित्या तेलंगणात वाहतूक होत आहे. रेती तस्करीला कंत्राटदाराएवढेच सिरोंचाचे तहसीलदार, नगरमचे तलाठी जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच रेतीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणी इरफान खान यांनी केली आहे. रेतीघाट कंत्राटदाराला आवंटीत करण्यात आलेले टीपी बुक जप्त करून त्याची चौकशी करावी, असेही खान यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पोलिसांची चुप्पीचसिरोंचा येथे अवैध रेती उत्खनन होत असल्याबाबतची माहिती आपण स्थानिक पोलिसांना दिली होती. त्यांना शासनाने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, असे इरफान पठाण यांनी सांगितले.