शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:04 IST

ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देखासदारांचे निर्देश : सांसद आदर्श ग्राम ठाणेगावातील कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. सदर विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत ठाणेगाव येथे स्वच्छता अभियानाचा शुभारंभ खा. नेते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर आरमोरी पं. स. चे सहायक संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, सरपंच नीता मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, तालुका महामंत्री गोपाल भांडेकर, पंचायत विस्तार अधिकारी परसा, शिक्षणाधिकारी लालाजी कुकुडकर, जि. प. सदस्य मितलेश्वरी खोब्रागडे, पोलीस निरीक्षक अजित राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खा. अशोक नेते म्हणाले, ठाणेगावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण हे गाव दत्तक घेतले असून या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले. गावात मंजूर झालेल्या तलाठी इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, याशिवाय डाक कार्यालय, ग्राम पंचायत भवन, स्मशानभूमी शेड बांधकाम, रस्ता खडीकरण आदी कामे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय ग्राम पंचायतींतर्गत वाढीव नळ पाणीपुरवठा योजना, शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाची जोडणी, कृषी गोदाम, क्रीडांगणाची उभारणी, व्यायाम शाळा, सार्वजनिक वाचनालय, आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीगृह, उपकेंद्राला संरक्षण भिंत, सीसी रोड, जि. प. शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, अशी माहिती खा. नेते यांनी दिली.बौद्ध समाजासाठी सभागृह, समाजमंदिर, शीतगृह, वनीकरण तसेच कौशल्य योजनेंतर्गत प्रशिक्षण व इतर विकास कामांचा आढावा खा. नेते यांनी यावेळी घेतला. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ हजर होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते