शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटीच्या कंत्राटानंतरही नाल्या तुंबलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत ...

ठळक मुद्देपावसाळापूर्व सफाई नाही : कंटेनर कचऱ्याने भरलेले, पाऊस पडताच वाढणार अस्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्यांची नियमित सफाई होऊन सांडपाणी वाहते राहावे, तसेच घराघरातून निघणाऱ्यां कचऱ्यांची वेळीच विल्हेवाट लागावी यासाठी गडचिरोली नगर परिषदेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चातून दोन कंत्राट दिले. मात्र संबंधित कंत्राटदारांनी शहर स्वच्छतेचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुंबलेल्या असल्याने पाऊस पडताच डासांची उत्पत्ती, रोगराईत वाढ होण्याची शक्यता आहे.शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेकडे १५ पुरूष आणि ९ महिला असे २४ स्थायी कर्मचारी आहेत. मात्र शहरातील संपूर्ण १२ प्रभागांमधील नाल्यांचा नियमित उपसा करून उपसलेला गाळ नगर परिषदेच्या खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात नेऊन टाकण्यासाठी नगर परिषदेने जानेवारी २०१८ मध्ये १ कोटी ४८ लाख ३१ हजार ४८७ रुपयांचा कंत्राट दिला. चंद्रपूरच्या श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने हा कंत्राट मिळविला. मात्र कंत्राटात दिलेल्या अटींची पूर्तता सदर संस्थेकडून होताना दिसत नाही.कंत्राटातील अटीनुसार दर १५ दिवसातून एकदा नाल्यांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी १०८ मजूर आणि काढलेला गाळ घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पोहोचविण्यासाठी दररोज ६ ट्रॅक्टर लावणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात एवढे मजूर कामावरच नसतात. परिणामी बहुतांश भागात एक ते दिड महिन्यापर्यंत नाल्यांचा उपसा होत नाही.नगर परिषदेसमोरच नाल्या तुंबलेल्याशहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या नगर परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या धानोरा मार्गावरील नाल्या दोन्ही बाजुने कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. त्यामुळे तिथे दुर्गंधी सुटली आहे. काही दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या आवारात रस्त्याच्या कडेला महिला बचत गटाने झुनका भाकर केंद्र लागले आहे. अस्वच्छ नालीच्या शेजारी नागरिकांना झुनका भाकर खावे लागते.कंटेनर तुडूंब भरलेलेसर्व प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरून दररोज घंटागाड्या फिरवून घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने श्री गजानन बहुउद्देशिय बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला वार्षिक ५४ लाख ७३ हजार ८०३ रुपयांना कंत्राट दिला. दररोज ८१ मजुर त्यासाठी कार्यरत असणे अपेक्षित आहे. पण तेवढी मजूरसंख्या राहात नसल्यामुळे घंटागाड्या दररोज येतच नाही. याच कंत्राटदाराकडे कंटेनर भरल्यानंतर तो न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर नेऊन रिकामा करण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणचे कंटेनर कचºयांनी भरले असताना ते अनेक दिवसपर्यंत हलविले जात नाही. परिणामी तिथे दुर्गंधी सुटते. याशिवाय डासांचे प्रमाण वाढते.नाल्यांची सफाई होते, पण आधीच्या कार्यकाळात तयार झालेल्या नाल्यांचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे पाणी वाहून जात नाही. कंटेनर उचलण्यासाठी एकच पीकअप वाहन आहे. शहरातील मेलेले डुकर उचलण्यासाठीही त्याच वाहनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कंटेनर उचलून घन कचरा व्यवस्थापन केंद्रावर कचरा नेऊन टाकण्यासाठी कधी कधी उशीर होतो. न.प.कडे आणखी एक पीकअप वाहन असणे गरजेचे असून ते खरेदी करण्याचा विचार सुरू आहे.- अनिल कुनघाडकर,उपाध्यक्ष तथा सभापतीआरोग्य समिती, न.प. गडचिरोली