शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासानंतरही रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई नाही

By admin | Updated: February 14, 2017 00:45 IST

महसूल व उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी रेतीघाटावर आकस्मिक धाड टाकून संयुक्त कारवाई केल्यावर वाहनांच्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

५८ वाहनांवर कारवाई : १७ वाहने कारवाईस पात्रसिरोंचा : महसूल व उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी रेतीघाटावर आकस्मिक धाड टाकून संयुक्त कारवाई केल्यावर वाहनांच्या आकडेवारीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २४ तास उलटल्यानंतरही रेती तस्करांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.धाडसत्राची सदर कारवाई उपविभागीय अधिकारी राममूर्ती व अहेरीचे अतिरिक्त अधीक्षक ए. राजा यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाच्या पथकाने पार पाडली. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात नगरम २ च्या गोदावरी घाटावर रेती भरलेले ११ ट्रक आढळून आले. ३० ट्रक्स रिकामे असल्याने त्यांचा कारवाईशी सबंध नाही, असे सांगण्यात आले. रेतीचे ट्रक्स सिरोंचा पोलीस ठाण्यात आणून ठेवले असून संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगरम २ वरील ट्रक्सची संख्या ४१ होते. सदर कंत्राट रोशरेड्डी बंडम यांच्या साई कन्स्ट्रक्शनच्या नावे असून ते उपविभागातील अहेरीचे रहिवासी आहेत. नगरम २ हा घाट भूमापन क्रमांक ५२६ च्या दक्षिण/पश्चिमेस गोदावरी पात्रात आहे. रेती उत्खननाचे क्षेत्र ०४.९५ हेक्टर आर असून या क्षेत्रातून ५२ हजार ४७३ ब्रास रेतीचा उपसा अपेक्षीत आहे. त्यापोटी अंतिम अपसेट किंमत ३ कोटी ९३ लक्ष ५५ हजार रूपये असून कंत्राटदाराने अनामत रक्कम ७८ लक्ष ७१ हजार शासनास प्रदान केली असल्याची माहिती आहे.वडधम मार्गावरील सहा ट्रक्स संयुक्त पथकाने तहसील कार्यालयाजवळ पुढील चौकशीसाठी थांबवून ठेवले आहेत. हे तांत्रिकदृष्ट्या खरे असले तरी प्रत्यक्ष क्वारीत ११ वाहने उभी होती व एक एक्झावेटर होता, असे प्रत्यक्षदर्शी लोकांचे म्हणणे आहे. वडधम, सिरोंचा मार्गावर पकडलेल्या सहा वाहनात अंकिसा मालगुजारी घाटाचा एक व चिंतरेवुला घाटाचा एक ट्रक्सचा समावेश आहे. वडधम घाटाचा कंत्राटदार कोण याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी गोवर्धन गागापुरपू यांना फोन संपर्क केला. त्यांनी फोन उचलला. पण निवडणूक कामात व्यस्त असल्याने माहिती उपलब्ध करून दिली नाही. या रेती तस्करीत जिल्हा स्तरापासून अधिकारी व अहेरी स्थित एका लोकप्रतिनिधीचेही संबंध असल्याचे परिसरात बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)