शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू व दारूमुक्त मोहिमेचे मूल्यांकन करा

By admin | Updated: April 19, 2017 02:09 IST

दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली मोहीम राबविताना याचा थेट संबंध मुख कर्करोगाशी आहे.

विभागीय आयुक्तांचे निर्देश : व्यसनमुक्ती कामाचा घेतला आढावा गडचिरोली : दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली मोहीम राबविताना याचा थेट संबंध मुख कर्करोगाशी आहे. याची जाणीव सर्वांना करून दिल्यास प्रभावी काम करणे शक्य आहे. जिल्हा प्रशासन व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व दारू मुक्तीची केवळ मोहीम राबवून चालणार नाही. आजवर व्यसनमुक्तीसाठी अनेक प्रयत्न झाले. आता झालेल्या कामाचे व प्रयत्नाचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिले. जिल्हा प्रशासन व सर्चच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली कृती दलाची स्थापना करण्यात आली. या कृती दलामार्फत गडचिरोली जिल्ह्यात आजवर झालेल्या कामाचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, सर्चचे प्रमुख डॉ. अभय बंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल आदी उपस्थित होते. व्यसनमुक्ती मोहिमेचे काम करणाऱ्या गडचिरोली कृती दलाची बैठक नियमित स्वरूपात घेण्यात यावी, झालेल्या कामातून प्रत्यक्ष काय परिणाम झाला, याचे प्रतिबिंब दर्शविणारा अहवाल आगामी बैठकीत सादर करावा, असे आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. तंबाखु मुक्तीसाठी कार्यालय तसेच शालेयस्तरावर काम झालेले दिसले पाहिजे. तंबाखुमुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे परिणाम अधिक आहे. या दृष्टीकोणातून गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवा, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. या संदर्भात प्रशिक्षकांना पुणे येथे प्रशिक्षणासाठी यशदा अंतर्गत असणाऱ्या मास्टर ट्रेनरकडे पाठविले जात आहे. आगामी काळात हे प्रशिक्षण गडचिरोली येथेच देण्याचे काम सर्च संस्थेने करावे, असे अनुपकुमार यांनी सांगितले. सदर आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी आरोग्य विभागातर्फे तर सर्च संस्थेतर्फे डॉ. मयूर गुप्ता यांनी पॉवरपार्इंटद्वारे सादरीकरण केले. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) कीर्तनातून प्रबोधन गडचिरोली जिल्ह्याच्या तंबाखू व दारूमुक्त मोहिमेच्या कामाला सर्च संस्थेसोबत टाटा ट्रस्टने मदत देऊ केली आहे. व्यसनमुक्तीवर प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन चार ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. याशिवाय गडचिरोली येथे मुक्ती दिनाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विनाशुल्क वेळ देऊन व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले, अशी माहिती डॉ. अभय बंग यांनी आढावा बैठकीत दिली.