एटापल्ली तालुक्यात १० ते १२ गावांत बीएसएनएलची एकमेव सेवा आहे. जिल्हाभरातील ग्राहकांपैकी अनेक ग्राहक एकट्या एटापल्ली तालुक्यात आहेत. तालुक्यातून बऱ्याप्रमाणात आर्थिक उत्पन्न बीएसएनएलला प्राप्त होते. परंतु त्या तुलनेत ग्राहकांना बीएसएनएलची योग्य सेवा मिळत नाही. मागील तीन दिवसांपासून थ्री-जी सेवा पूर्णत: कोलमडली आहे. ग्राहकांनी मारलेल्या इंटरनेट पॅकचा उपयोग होत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.
येथे पाच वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीने टॉवर उभारले होते. परंतु अद्यापही सेवा सुरू झाली नाही. सदर टॉवर शोभेची वस्तू म्हणूून उभे आहे. बीएसएनएलमार्फत एटापल्लीत मागील अनेक वर्षांपासून योग्य सेवा दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये बीएसएनएलविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणीही ग्राहकांनी केली आहे.