शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात कार्यकारिणी गठित

By admin | Updated: November 1, 2014 22:53 IST

गोंडवाना विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारी मंडळ व कार्यक्रम सल्लागार मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारी मंडळ व कार्यक्रम सल्लागार मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारिणीचे गठण राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सी. डी. मायी, सदस्य म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, ग्रामीण क्षेत्र तंत्रज्ञान विकल्प केंद्राचे प्रमुख, बीसीयुडीचे संचालक, जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी चंद्रपूर, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालकीय व्यवस्थापक डॉ. विवेक सावंत, मोहन हिराबाई हिरालाल, भारतीय कृषी औद्योगिक संस्थांचे अध्यक्ष गिरीष सोहनी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, एसटीआरसीचे सचिव आदी सदस्यांचा समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यक्रम सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, एसपीआरसीचे समन्वयक, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रतिनिधी गोंडवाना विद्यापीठाच्या बीसीयुडीचे संचालक, मुख्य वनसंरक्षक एस.के. रेड्डी, आयआयटीबी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहनी, धातुकर्म व पदार्थ अभियांत्रिकी विभागाचे डॉ. दिलीप पेशवे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रा. डी. एस. रघुवंशी, पीडीकेव्ही गडचिरोली कृषी महाविद्यालयाचे पी. आर. कडू, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था वर्धाच्या प्रगती गोखले, लवादा संपूर्ण बांबू केंद्राचे सुनिल देशपांडे, रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूरचे संचालक डॉ. ए. के. जोशी आदींचा सदस्य म्हणून सहभाग आहे. संसाधन केंद्राचे पालकत्व भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई स्वीकारणार असून वनविभाग गडचिरोली हे या केंद्राला सहकार्य करणार आहेत. त्याबरोबरच विविध राष्ट्रीय संस्था केंद्राच्या उभारणीकरिता सहकार्य करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासकीय सुत्राकडून देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)