शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आसरअल्ली तालुक्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:58 IST

तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी,....

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थी संघाची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात आविसंच्या या शिष्टमंडळाने थेट सिरोंचाच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, संतोष भिमकरी, असरअल्ली तंमुसचे अध्यक्ष समय्या तोरकरी, रसुल शेख मेहबूब, विजय तुमडे, संजय चिंताकाणी, श्रीशैलम मोरला, लक्ष्मण सिडाम, समय्या गावडे, समय्या कोडापे, विजय भिमकरी, समय्या चौधरी, सुरेश पेटकरी, बिचमन्ना भडे, संतोष चेनुरी, शरद गुंडे, सुधाकर वायम, गणेश टेकाम, पुरूषोत्तम सुर्पा आदी उपस्थित होते.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आविसंने म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून असरअल्ली हे गाव २५० किमी अंतरावर आहे. सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेला पातागुडम हे गाव तालुक्यापासून ५५ किमी अंतरावर आहे. असरअल्ली महसूल मंडळ अंतर्गत १४ ग्रामपंचायती असून अनेक गावांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त डोंगराळ व जंगलव्याप्त हा भाग असल्याने सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.