शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
2
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
7
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
8
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
9
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
10
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
11
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
13
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
14
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
15
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
16
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
17
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
18
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुट्यांपूर्वीच शिक्षकांचे पलायन

By admin | Updated: May 9, 2015 01:46 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १० मे ते २५ जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या असल्या तरी मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातून ...

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १० मे ते २५ जून या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या असल्या तरी मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या शिक्षकांनी २ मे रोजीच शाळा सोडली आहे. मात्र केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना मॅनेज केल्याने त्यांचे पगारही व्यवस्थीत निघणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना यावर्षी सुरुवातीला २ मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा निकाल १ मे रोजी महाराष्ट्र दिनी घोषित करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार शिक्षकांनी २ मे पासून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली होती. मात्र ऐन वेळेवर गडचिरोली जिल्ह्यातील २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या रद्द करण्यात आल्या व त्या शिक्षकांना काम करीत असलेल्या ठिकाणावरून भारमुक्त करून त्यांच्या जुन्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. या शिक्षकांना रूजू होता यावे, यासाठी शिक्षकांच्या सुट्या २ मे ऐवजी १० मे पासून जाहीर करण्यात आल्या. मात्र मराठवाडा, पश्चिम विदर्भ व खानदेशातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाला न जुमानताच २ मे रोजीच जिल्हा सोडला व स्वत:चे गाव गाठले आहे. असे प्रकार दुर्गम भागातील शाळांमध्ये जास्त घडले आहेत. या शिक्षकांनी पद्धतशिरपणे गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना मॅनेज केले आहे. त्यामुळे याबाबतची वाच्छता उघडपणे केली जात नसल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकही २ मे पासून शाळा बंद झाल्याचे समजून शिक्षकांबाबत कोणतीही तक्रार करीत नाही. धानोरा एटापल्ली, भामरागड, कोरची, सिरोंचा या दुर्गम भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ४०० शिक्षकांनी अवैध पद्धतीने शाळा सोडली आहे. शिक्षक शाळेत नियमितपणे येत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची आहे. मात्र हेच अधिकारी मॅनेज झाले असल्याने कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (नगर प्रतिनिधी)