शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

सीओंचे पलायन; सभा तहकूब

By admin | Updated: April 24, 2015 00:03 IST

पालिकेअंतर्गत ६० कंत्राटी सफाई कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी बंद केले. नाली स्वच्छतेचे नवे कंत्राट गतवर्षीपेक्षा कमी बजेटचे व कमी कामगाराचे ठेवल्याचा मुद्दा

गडचिरोली : पालिकेअंतर्गत ६० कंत्राटी सफाई कामगारांना मुख्याधिकाऱ्यांनी बंद केले. नाली स्वच्छतेचे नवे कंत्राट गतवर्षीपेक्षा कमी बजेटचे व कमी कामगाराचे ठेवल्याचा मुद्दा सभेच्या सुरुवातीलाच पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सभागृहात काही सदस्य आक्रमक झाले. दरम्यान मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे हे सभा आटोपण्यापूर्वीच सभागृहातून निघून गेले. त्यामुळे पालिकेची गुरूवारची सर्वसाधारण सभा तहकूब झाली.विविध ३२ महत्त्वाच्या विषयावर गडचिरोली पालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्ष निर्मला मडके यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात बोलाविण्यात आली. या सभेला पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पोरेड्डीवार, नंदू कायरकर, माधुरी खोब्रागडे, लता मुरकुटे, संध्या उईके, सुषमा राऊत आदी उपस्थित होते.सभेला नगर पालिकेच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे सभागृहात आल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरुवातीलाच पालिकेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी बन्नोरे यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. पालिकेतील अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी हे पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सूचनांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप उपस्थित सदस्यांनी केला. त्यानंतर मुख्याधिकारी बन्नोरे सभागृहातून निघून गेले. त्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करीत नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ही सर्वसाधारण सभा तहकूब केली.यावेळी उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी सांगितले की, नगर पालिका अधिनियम ५८/२ नुसार विकास कामांचे व पालिकेतील दैनंदिन कामांबाबत सभागृहात कार्योत्तर मंजुरी घेण्याचा पालिकेच्या अध्यक्षांना अधिकार आहे. मात्र मुख्याधिकारी बन्नोरे यांनी सभागृहाची मान्यता न घेता शहरातील नाली सफाईच्या कामाच्या कंत्राटाबाबत तिनदा निविदा काढली. अपूर्ण कागदपत्र असतानाही एका संस्थेला कंत्राट देण्याचा मुख्याधिकारी बन्नोरे यांचा प्रयत्न होता. मात्र पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाल्यामुळे त्या संस्थेचा निविदा टेंडर रद्द करण्यात आला, अशी माहिती चौधरी यांनी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे शहरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)सीओंच्या कक्षाला कुलूप ठोकणारमुख्याधिकारी बन्नोरे यांच्यावर निलंबनाची व बेशिस्त कर्मचाऱ्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करावी, या मागणीचे निवेदन न. प. च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत सीओंच्या कक्षाला कुलूप ठोकणार, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या हेकेखोर प्रवृत्तीतून पालिकेचा कारभार सुरू आहे. चर्चा न करता परस्पर नगर परिषदेतील १५० च्यावर अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून बंद केले. यामुळे नगर परिषद कार्यालयाचा कामकाज मंदावला आहे. १ एप्रिलपासून शहरातील नाली स्वच्छता बंद आहे. असा आरोप उपाध्यक्ष रमेश चौधरी यांनी केला.